धक्कादायक: पुण्यात स्कूलबसमध्ये विद्यार्थिनीसोबत चालकाचे अश्लिल चाळे

धक्कादायक: पुण्यात स्कूलबसमध्ये विद्यार्थिनीसोबत चालकाचे अश्लिल चाळे

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात स्कूल बस चालकाने विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

  • Share this:

पुणे,15 डिसेंबर: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात स्कूल बस चालकाने विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप पांडुरंग काळे (24, रा.चिंबळी, ता.खेड, जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी इंद्रायणी नगर येथील एका शाळेच्या स्कूलबसचा चालक आहे. काळे शनिवारी (14 डिसेंबर) विद्यार्थिनीला घेण्यासाठी तिच्या घराजवळ गेला होता. पीडित विद्यार्थिनी बसमध्ये बसल्यानंतर त्याने जबरदस्तीने तिचा हात हातात घेऊन तिच्याशी अश्लिल चाळे केले. एवढेच नाही तर हा प्रकार कोणाला सांगितला तर आई-वडिलांनी जिवंत ठेवणार नाही, अशी तिला धमकी दिली. तरी देखील पीडित विद्यार्थिनीने हिंमत करून घरी आल्यानंतर आई-वडिलांना आपबिती सांगितली. पीडितेच्या आई-वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हैदराबादेत पुन्हा दुष्कृत्य.. जावईने केला सासूवरच बलात्कार

तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची घटना ताजी असताना पुन्हा बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. एका नाराधमाने आईसमान सासूला आपल्या वासनेची शिकार केले आहे. पोलिसांनी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तिच्या जावईला अटक केली आहे. जावईविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हैदराबादेतील पंजागट्ट पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

48 वर्षीय पीडितेने शुक्रवारी तिच्या जावईविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. पीडित महिला एका अपार्टमेंटमध्ये मुलगी आणि जावईसोबत राहते. दारूच्या नशेत जावयाने बलात्कार केल्याचे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही घटना घडली तेव्हा पीडित महिला घरात एकटी होती. आरोपी जावईने याचा फायदा घेऊन सासूला वासनेची शिकार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरुद्ध भादंवि कलम 376 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत असून आरोपीचे नाव गोपनिय ठेवले आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 15, 2019, 9:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading