शिष्यवृत्ती घोटाळा: ईडी नोटीसीला तब्बल 780 नामांकित कॉलेजची केराची टोपली

शिष्यवृत्ती घोटाळा: ईडी नोटीसीला तब्बल 780 नामांकित कॉलेजची केराची टोपली

या नामांकित कॉलेजेस सोबतच काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्याही अनेक शिक्षण संस्था देखील या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत.

  • Share this:

पुणे,24 जानेवारी: शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी समाज कल्याण खात्यामार्फत पुणे जिल्ह्यातील शिक्षण संस्थाना पाठवण्यात आलेल्या ईडी नोटीसीला तब्बल 780 महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवली आहे. फडणवीस सरकारने ईडीमार्फत या शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील 1609 शिक्षणसंस्थाना शिष्यवृती वाटपाचा हिशेब सादर करण्याचे निर्देश दिले होते. पण त्याची मुदत उलटून पुणे जिल्ह्यातील 780 शिक्षण संस्थानी अद्यापही समाजकल्याण खात्याला शिष्यवृत्ती वाटपाचा हिशेबच सादर केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

शिष्यवृत्ती घोटाळा नेमका आहे तरी काय?

पुणे जिल्ह्यात मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाटपात घोटाळ झाल्याप्रकरणी ईडीने नोटीसा पाठवूनही 780 शिक्षणसंस्थांनी माहिती दिलीच नाही! मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शिक्षणसंस्थानीच हडप केली? शिष्यवृत्तीचा हिशेब न देणाऱ्या संस्थांवर ईडी कारवाई करणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राज्याच्या समाजकल्यान विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी करोडो रुपयांची शिष्यवृत्ती वाटली जाते. पण 2010 ते 2017 या कालावधीत याच मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाटपात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने होत होता. कारण शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्तीच मिळत नव्हती. विशेष म्हणजे संबंधीत महाविद्यालयांना समाजकल्याण खात्यामार्फत शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग होऊनही विद्यार्थ्यांना ती मिळत नव्हती. म्हणूनच तत्कालीन फडणवीस सरकारने या मागासवर्गीय शिष्यवृत्ती घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली.याच समितीच्या चौकशीदरम्यान या शिष्यवृत्ती वाटपात अनेक अनियमितता आढळून आल्यानंतर हे प्रकरण अखेर ईडीकडे सोपवलं गेलं होतं. त्यानंतर ईडीने समाजकल्याण खात्यामार्फत पुणे जिल्ह्यातील सर्व म्हणजेच 1609 शिक्षणसंस्थांना शिष्यवृत्ती वाटपाचे हिशेब सादर करण्याच आदेश दिले. या ईडीच्या नोटीसीला उत्तर देण्याची मुदत संपूनही तब्बल 780 शिक्षणसंस्थांनी शिष्यवृत्ती वाटपाचे हिशेबच सादर केलेले नाहीत.

या शिष्यवृत्ती घोटाळ्याबाबत आम्ही पुणे जिल्हा समाजकल्याण खात्याकडे चौकशी केली असता त्यांनीही ही बाब मान्य केलीय. पण कारवाईबाबत विचारताच त्यांनी ईडी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवलं आहे. ईडीच्या नोटीशीला केराची टोपली दाखवणाऱ्या 780 महाविद्यालयांमध्ये पुण्यातील कोणकोणत्या नामांकित शिक्षणसंस्थांचा समावेश आहे.

2010-17 सालचा मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाटप घोटाळा H 'या' नामांकित शिक्षणसंस्थांनी हिशेब दिलाच नाही. भारती विद्यापीठ, सिंहगड शिक्षणसंस्था, मराठवाडा मित्रमंडळ, डीवाय पाटील कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, मॉर्डन कॉलेज, गरवारे कॉलेज, सिम्बॉयसिस कॉलेज, डेक्कन शिक्षण संस्था, एसएनडीटी कॉलेज, GFX OUT या नामांकित कॉलेजेस सोबतच काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्याही अनेक शिक्षण संस्था देखील या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्यावर शिष्यवृत्तीची रक्कम ही परस्पर इतरत्र वळवल्याचा गंभीर आरोप आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर स्थापन झालेलं हे ठाकरे सरकार या मागासवर्गीय शिष्यवृत्ती घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2020 06:18 PM IST

ताज्या बातम्या