पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमध्ये प्राचार्यांनी घातली सत्यनारायण पूजा!

पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमध्ये प्राचार्यांनी घातली सत्यनारायण पूजा!

पुण्यातील अत्यंत नामांकित समजल्या जाणाऱ्या फर्गुसन कॉलेज मध्ये सत्यनारायण पूजा करण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 24 ऑगस्ट :  पुण्यातील अत्यंत नामांकित समजल्या जाणाऱ्या फर्गुसन कॉलेज मध्ये सत्यनारायण पूजा करण्यात आली आहे. फर्गुसन कॉलेज च्या ऍडमिशन डिपार्टमेंट मध्ये ही पुजा करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फर्गुसन कॉलेज वादाच्या भोवऱ्यात सापडन्याची शक्यता निर्माण झाली आहे. फर्गसन कॉलेजात श्रावण महिन्यानिमित्त सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली आहे. पण कॉलेज आवारात धार्मिक कर्मकांड करायला परवानगी आहे का असा जाब विचारत आंबेडकराइट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसराक मोठं आंदोलन केलं आहे. यासंबंधी कॉलेजचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांना विचारलं असता त्यांना माध्यामांशी बोलण्यास नकार दिला आहे.

अलीकडेच युजीसी ने फर्गुसन कॉलेजला अभिमत कॉलेज चा दर्जा दिला आहे. त्यात कॉलेज मध्ये सत्यनारायण पुजा करून कॉलेज ला एका विशिष्ट धर्माला चालना देत असल्याच आरोप पुरोगामी विचारा सरणीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे यासगळ्याचा निषेध करत फर्गुसन कॉलेजमध्ये फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली आहे. कॉलेजमध्ये धार्मिक अनुष्ठान घेणाऱ्या प्राचार्यला निलंबित करा अशी मागणी विद्यार्थ्यांनकडून करण्यात आली आहे.

या सगळ्या महत्त्वाची बाब म्हणजे ज्यापद्धतीने एखाद्या मंदिरात सत्यनारायणाची पूजा केली जाते अगदी त्याचप्रमाणे कॉलेमध्ये पूजचें आयोजन करण्यात आलं आहे. कॉलेजबाहेर सत्यनारायणाच्या पूजेसाठी निमंत्रण बोर्डही लावण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

PHOTOS : ‘हे’ कलाकार आधी होते भाऊ-बहिण मग झाले 'कपल'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2018 12:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading