• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • आयुकाने शोध लावला 'सरस्वती' आकाशगंगेचा !

आयुकाने शोध लावला 'सरस्वती' आकाशगंगेचा !

सरस्वती असं या आकाशगंगेला नाव देण्यात आलंय

  • Share this:
हलिमा कुरेशी, पुणे पुणे, 15 जुलै: 'आयुका' (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स ) च्या खगोलशास्त्रज्ञांनी महाकाय आकाशगंगेचा समूह शोधलाय. 'सरस्वती' असं या आकाशगंगेला नाव देण्यात आलंय. पृथ्वी ज्या आकाशगंगेत आहे त्या आकाशगंगेपासून ही शोध लागलेली नवी आकाशगंगा चार अब्ज प्रकाशवर्ष दूर आहे. दहा अब्जवर्षांपूर्वी ही महाकाय आकाशगंगा निर्माण झाली असून त्यात अब्जावधी सूर्य असण्याची शक्यता आहे. असा दावा आयुकाच्या संशोधकांनी केला आहे. अमेरिकेच्या अॅस्ट्रोफिजिकल जर्नल या संशोधन पत्रिकेत यासंबंधीचा प्रबंध प्रसिद्ध झालाय. 'सरस्वती' या नवीन महाकाय आकाशगंगांच्या समुहाचा शोध पुण्यातील आयुका आणि आयसर या विज्ञान संशोधन संस्थांनी लावला आहे. हा महाकाय समूह आपल्या आकाशगंगेपासून ४ अब्ज प्रकाशवर्ष  दूर आहे. या समुहात दहा हजार आकाशगंगा आहेत. वायूचे महाकाय ढग आणि गुरुत्वाकर्षनाने या समुहातील आकाशगंगा जोडल्या गेल्या आहेत. नुकताच अमेरिकेतील अस्ट्रोफिजिक या संशोधनपत्रिकेत  हे संशोधन प्रकाशित झालं आहे. अनेक वर्षांपासून अशा प्रकारचा समूह असू शकतो यावर जगभरात कुतूहल होते. मात्र भारतीय शास्त्रज्ञांनी अभिमानास्पद कामगिरी करत हा शोध लावला आहे.
First published: