मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

"आम्ही पाठीमागून नाही तर समोरून खंजीर खुपसतो" राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

"आम्ही पाठीमागून नाही तर समोरून खंजीर खुपसतो" राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.

जुन्नर, 4 सप्टेंबर : शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यातील युती तुटल्यापासून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर वारंवार टीका करत असल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना रोखठोक प्रत्युत्तर (Sanjay Raut replies Chandrakant Patil) दिलं आहे.

जुन्नर येथील कार्यक्रमात संजय राऊत म्हणाले, पूर्वी खंजिर खुपसने हा शब्दप्रयोग फक्त शरद पवारांवर होत होता. मात्र चंद्रकांत पाटलांना सांगतो बाबा, आम्ही समोरून कोथळा काढतो मागून नाही. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही.... शिवसैनिकांच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटलांचा खरपूस समाचार घेतला.

"...आणि मी घरी जाऊन लेहंगा तपासला" : राज ठाकरे

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं, शिवसेनेने केलेला विश्वासघात म्हणजे पाठीत खंजीर खुपसन होय. सोबत राहायचं नव्हतं तर मग युती कशाला केली? शिवसेना फक्त मुंबईत होती त्याला भाजपने विदर्भ आणि मराठवाड्यात वाढवलं. मात्र शिवसेनेने भाजपच्याच पाठीत खंजीर खुपसला अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

भाजपा प्रामाणिक मित्रपक्षांना सोबत घेऊन यापुढे सर्व निवडणुका स्वतःच्या ताकदीवर लढवेल आणि जिंकेल ही. ज्यांनी मोदींच्या नावावर मते मागितली आणि आमचा विश्वासात केला अशा विश्वास घातक्यांबरोबर आम्हाला काम करायचं नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला होता. आमच्यावर प्रेम करणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन यापुढे निवडणुका लढवून त्या जिंकून दाखवू असंही त्यांनी म्हटलं होतं.

First published:

Tags: Chandrakant patil, Sanjay raut