उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणं अयोग्य, राऊतांचा राज ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणं अयोग्य, राऊतांचा राज ठाकरेंना टोला

कदाचित देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही शरद पवारांचे मार्गदर्शन घेत असतील. पण...

  • Share this:

पुणे, 31 ऑक्टोबर: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी दोन दिवासांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांची भेट घेतली होती. दूध उत्पादक शेतकरी आणि वाढीव वीज बिलाच्या मुद्यांवर राज यांनी राज्यपालांशी चर्चा केली होती. मात्र, राज्यपालांनी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) हे राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटणं योग्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा..आता येथूनही भाजपच्या हातून सत्ता निसटणार, राष्ट्रवादीनं आणखी 6 नगरसेवक फोडले

संजय राऊत म्हणाले की, कदाचित देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही शरद पवारांचे मार्गदर्शन घेत असतील. पण मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणं योग्य नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. इतर विषय ठिक हे पण वीज बिलासाठी राज्यपालांकडे गेल्याचं यापूर्वी ऐकिवात नाही. असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं. राजभवन ही राजकारणाची जागा नाही. आम्ही घटनात्मक पदाचा सन्मान करतो, असं सांगत राऊत यांनी राज्यपालांनाही चिमटा काढला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी 29 ऑक्टोबर रोजी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाबद्दल राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन दिले होते. यावेळी राज्यपालांनी शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता.

'लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. म्हणून राज्यपालांची भेट घेतली असल्याचे राज यांनी सांगितले होते.

त्याचबरोबर, 'एका छोट्याशा विषयाला इतका वेळ लावण्यात आला आहे. कळतं नाही नेमकं काय अडकलं आहे. त्यामुळे या विषयावर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलणार आहे', असंही राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार, आज राज यांनी शरद पवारांशी फोनवर चर्चा केली. यावेळी राज यांनी सर्वसामन्याच्या वीज बिलात झालेली वाढ कमी करण्यात यावी, याबद्दल चर्चा केली.

हेही वाचा...बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचं निधन

तसंच, 'आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे शेतकऱ्याला 17 ते 18 रुपये देतात आणि त्यावर भरघोस नफा कमवत असतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल करणे महाग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका लिटरमागे 27 ते 28 रुपये मिळावे', अशी मागणीही राज ठाकरेंनी केली. यावेळी राज्यपालांच्या भेटीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं.

Published by: Sandip Parolekar
First published: October 31, 2020, 12:34 PM IST

ताज्या बातम्या