Home /News /pune /

गाड्या हलवल्या तर पेटवून देऊ, शिवभक्तांनी फोडल्या संभाजी बिडीच्या गाड्या, पाहा हा VIDEO

गाड्या हलवल्या तर पेटवून देऊ, शिवभक्तांनी फोडल्या संभाजी बिडीच्या गाड्या, पाहा हा VIDEO

बिडीला दिलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नावं हटवण्यासाठी शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे.

    पुणे, 07 सप्टेंबर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने विकल्या जाणाऱ्या बिडीची नाव बदलावे या मागणीसाठी शिवभक्त आंदोलन करत आहे. अखेर आज शिवभक्तांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. शिवभक्तांनी बिडी घेऊन जाणारे ट्रक फोडले आहे. पुरंदर किल्याच्या पायथ्याशी शिवभक्तांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक संघटना पुढे सरसावल्या आहे. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी बिडी घेऊन जाणाऱ्या ट्रकची तोडफोड करण्यात आली आहे. तसंच, संभाजी बिडीचे नावं बदला नाही तर दहा दिवसात कंपनी पेटवून देऊ, असा इशारा मराठा आरक्षण कृती समितीने दिला आहे. बिडीला दिलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नावं हटवण्यासाठी शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षण समितीचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी संभाजी बिडीचे नावं बदलले नाही तर कंपनीच्या व्यवस्थापना धडा शिकवला जाईल असा इशारा दिला आहे. ही तर भाजपची पोपट, काँग्रेस मंत्र्याची कंगनावर जळजळीत टीका मराठा आरक्षण कृती समिती, आखिल भारतीय मराठा सेवा संघ, शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे, सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन, आखिल भारतीय होलार समाज संघटना, राष्ट्रीय विद्यार्थी संघटना शिवशंभू स्वराज्य संघटना, अशा अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याआधीही, महाराष्ट्रात गेल्या 80 वर्षांपासून संभाजी महाराजांच्या या नावाने बिडी विक्री केली जात आहे. हा संभाजी महाराजांचा अपमान आहे.  संभाजी बिडीचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी  शिवधर्म फाउंडेशनने केली होती. विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीची घोषणा, कोण मारणार बाजी? या बिडीच्या बंडलवर महाराजांच्या नावाने याची विक्री होते. तो कागद फाडून फेकला जातो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होतं आहे, हा अवमान सहन केला जाणार नाही. यासाठी या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने नाव बदलून निर्मिती करावे, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनने केली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या