कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना साई संस्थानचा मदतीचा हात, 10 कोटी रुपयांची मदत

कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना साई संस्थानचा मदतीचा हात दिला आहे. संस्थानने पूरग्रस्तांना 10 कोटी रुपयांची भरीव मदत केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 04:29 PM IST

कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना साई संस्थानचा मदतीचा हात, 10 कोटी रुपयांची मदत

शिर्डी, 10 ऑगस्ट- कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना साई संस्थानचा मदतीचा हात दिला आहे. संस्थानने पूरग्रस्तांना 10 कोटी रुपयांची भरीव मदत केली आहे. याच बरोबर 20 डॉक्टरांची टीम ही मदतीला पाठवण्यात येणार आहे. सोबत औषधीही पाठवली जातील, अशी माहिती साई संस्थांनचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी ट्वीट करून दिली. शिर्डीच्‍या वतीने राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी न्‍यायालयीन प्रक्रियेस अधिन राहुन मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानच्या अध्‍यक्षांनी दिली.

डॉ. हावरे म्‍हणाले, राज्‍यामध्‍ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या जलप्रलयाच्‍या थैमानामुळे विशेषताः पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरीक बेघर झाले असून अनेक गावेही उध्दवस्‍त झालेली आहेत. ही नैसर्गिक आपत्‍ती भीषण असून आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजुन या पूरग्रस्‍तांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्‍याचा निर्णय साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेने घेतला आहे. सदरचा निधी न्‍यायालयीन प्रक्रियेस अधिन राहुन मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍यात येणार असून संस्‍थानच्‍या वतीने परिस्‍थीती बघून वैद्यकीय पथक व औषधे ही पाठविणार आहे.

राज्‍य शासन पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्‍यात आलेली ही आपत्‍ती मोठी असून या आपत्‍तीतुन बाहेर पडण्‍यासाठी श्री साईबाबांच्‍या चरणी प्रार्थना करीत असल्‍याचे डॉ.हावरे यांनी सांगितले.

VIDEO : ...म्हणून गिरीश महाजनांनी सेल्फी व्हिडिओत हात उंचावला, मुख्यमंत्र्यांनी केलं समर्थन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2019 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...