राज्यातील 180 साखर कारखान्यांबाबत सहकारमंत्र्यांची पुण्यात मोठी घोषणा

राज्यातील 180 साखर कारखान्यांबाबत सहकारमंत्र्यांची पुण्यात मोठी घोषणा

कोरोनामुळे ऊसतोड कामगारांचा तुटवडा भासणार आहे.

  • Share this:

पुणे, 9 जुलै: राज्यात यंदा ऊस लागवड क्षेत्र वाढल्याने साखर गळीत हंगाम 15 ऑक्टोबरच्या आसपास सुरू करण्याचं नियोजन साखर आयुक्तालयाने आखलं आहे. राज्यात साधारणपणे 180 साखर कारखाने सुरू होणार आहेत. 800 लाख मेट्रिक टन उसाचे गाळपाचे उद्दिष्टे आहे, अशी घोषणा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

कोरोनामुळे ऊसतोड कामगारांचा तुटवडा भासणार आहे. मात्र, ऊसतोड कामगार कमी पडल्यास हार्व्हेस्टर वापरणार असल्याचं बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा..आम्हाला कोणतीही घाई नाही, आम्ही सरकार पडणार नाही, फडणवीस यांचं मोठ वक्तव्य

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरूवारी पुण्यात साखर कारखाने सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेतली. त्यात यंदा किमान 180 साखर कारखाने चालू करण्यासंबंधीचं नियोजन तयार करण्यात आलं आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील कोरोनाची आटोक्यात आली नाही. तर ऊसतोड मजूरांच्या सुरक्षेचं काय? मुळात मजूरच कोरोनासाथीमुळे ऊसाच्या फडावर आले नाही. तर हार्व्हेस्टर आणि स्थानिक मजुरांच्या साहाय्याने ऊसतोड केली जाईल, असा दावा सहकारमंत्र्यांनी केला आहे.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं की, 15 ऑक्टोबरपासून राज्यात कारखाने सुरू करण्याचे नियोजन आहे. जास्तीस जास्त सहकारी कारखाने सुरू करण्याचे नियोजन असून स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

हेही वाचा..

सहकारी सोसायट्यांवर गुन्हे दाखल...

कोरोनाच्या आडून रहिवाशांची अडवणूक करणाऱ्या गृहनिर्माण सोसायटी चेअरमन आणि सेक्रेटरीवर यापुढे आणखी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. राज्यात सध्या 3 ते 4 सहकारी सोसायट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच अनेक तक्रारी येत असल्याचंही बाळासाहे पाटील यांनी सांगितलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 9, 2020, 8:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading