• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • कर्णधारपदी धोनीचं नाव कुणी सुचवलं? शरद पवारांनी 'त्या' नावाचा केला खुलासा

कर्णधारपदी धोनीचं नाव कुणी सुचवलं? शरद पवारांनी 'त्या' नावाचा केला खुलासा

 'सचिन आणि द्रविड यांनी कर्णधार नको म्हटल्यानंतर माझ्या मनात पेच होता कर्णधार कोण?

'सचिन आणि द्रविड यांनी कर्णधार नको म्हटल्यानंतर माझ्या मनात पेच होता कर्णधार कोण?

'सचिन आणि द्रविड यांनी कर्णधार नको म्हटल्यानंतर माझ्या मनात पेच होता कर्णधार कोण?

  • Share this:
पुणे, 21 सप्टेंबर : टीम इंडियाचा (team india) माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या (mahendra singh dhoni) कारकिर्दीत भारताने वर्ल्डकपला गवसणी घातली. आज धोनी टीम इंडियासोबत मैदानात नसला तरी त्याची कारकीर्द सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली आहे. राष्ट्रवादीचे (ncp)अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) हे जेव्हा बीसीसीआयचे (bcci) अध्यक्ष होते, त्यावेळी धोनीची कर्णधारपदी निवड ही सचिन तेंडुलकरच्या (sachin tendulkar) सांगण्यावरून करण्यात आली होती, असा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. माजी कसोटीपटू चंदू बोर्डे (Former Test cricketer Chandu Borde) यांचा आज  शरद पवार यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. 'महेंद्र सिंह धोनीला कर्णधार करताना मी सचिनचा सल्ला घेतला होता. त्यावेळी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो. 2007 साली भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी राहुल द्रविड टीमचा (Rahul Dravid) कर्णधार होता. मीही त्यावेळी इंग्लंडमध्ये होतो, तेव्हा द्रविड मला भेटायला आला. आता मला भारतीय टीमचं नेतृत्व करायचं नाही, असं द्रविडने मला सांगितलं. नेतृत्वामुळे माझ्या बॅटिंगवर परिणाम होत आहे, त्यामुळे मला कॅप्टन्सीच्या जबाबदारीतून मुक्त करावं, असं द्रविड म्हणाला. यानंतर मी सचिनला टीमचं नेतृत्व करायला सांगितलं, पण त्याने नकार दिला, असं पवारांनी सांगितलं. T20 World Cup : सगळ्यात मोठा सामना भारताविरुद्ध नाही, तर... शोएबची या टीमला धमकी त्याचबरोबर, 'सचिन आणि द्रविड यांनी कर्णधार नको म्हटल्यानंतर माझ्या मनात पेच होता कर्णधार कोण? तर सचिननेच मला महेंद्रसिंग धोनीच नाव सागितलं. धोनीला कर्णधार करण्याबाबत माझ्या मनात शंका होती. पण सचिनने सांगितलेला हा खेळाडू उद्या देशाच नावं लौकिक करेल. अन् सचिनच्या सांगण्यावरून धोनीला कर्णधार केलं' असं शरद पवार यांनी पुन्हा एकदा आवर्जुन सांगितलं. क्रिकेटच्या बाबतीत मी स्वत:ला मुंबईकर म्हणवतो. त्यामुळे यापुढे आम्हा मुंबईकरांना खडूस म्हणायचं नाही. आम्हा मुबंईकराना खडूस म्हटलं जातं, पण आम्ही खडूस मुबंईकरांनीच आज चंदू बोर्डे यांचा सत्कार केला आहे, असं म्हणताच सभागृहात एकच हश्या पिकली.

300 कोटींची संपत्ती, बुर्ज खलिफात दोन मजले; या उद्योजकाने एका क्षणात गमावले सारे

'क्रिकेटमधील चंदू बोर्डे यांचं योगदान खूप मोठं आहे. कॉलेजला असताना माझीही देखील उत्तम क्रिकेट टीम होती. मी क्रिकेट विषयी आजवर नेहमीच आस्था बाळगून काम करत आलोय. माजी रणजीपटूं भाऊसाहेबांची व्यथा जाणून घेताच मी माजी क्रिकेटपटूंची पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. क्रिकेटमध्ये आलेला पैसा जुन्या खेळाडूंना देखील मिळाला पाहिजे ही त्यामागची भूमिका होती, असंही पवार यांनी सांगितलं. 'मी ललित मोदींचं कौतुक हे मी आयपीएल सुरू करण्यात योगदान आहे म्हणून करतोय, बाकी काही माझा संबंध नाही, असंही पवारांनी स्पष्टपणे सांगितलं. 'पत्रकारांनी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर विचारलं असता, पवार म्हणाले की, 'मी ज्या ठिकाणी खेळाच्या कार्यक्रमाला जातो, तिथं मी राजकीय बोलत नाही' असं म्हणत पवार यांनी राज्यपालांच्या विषयावर  बोलणं टाळलं.
Published by:sachin Salve
First published: