नव्या कोरोना विषाणूने वाढवली पुण्याच्या महापौरांची चिंता, नागरिकांना केलं 'हे' आवाहन

नव्या कोरोना विषाणूने वाढवली पुण्याच्या महापौरांची चिंता, नागरिकांना केलं 'हे' आवाहन

पुढील उपाय योजना राबविण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असं महापौरांनी जाहीरपणे सांगितलं आहे.

  • Share this:

पुणे, 26 डिसेंबर: कोरोनाचं नव रुप समोर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाचं स्वागत करताना गर्दी टाळा, घरात बसून सेलिब्रेशन करा, संयम राखा असं आवाहान करणारे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना आणखी एक विनंती केली आहे. ती म्हणजे, लंडन किंवा युरोपियन देशांमधून पुण्यात आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी आणि पुढील उपाय योजना राबविण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असं महापौरांनी जाहीरपणे सांगितलं आहे.

हेही वाचा..चंद्रकांत पाटील काल म्हणाले होते मी परत जाईन; आज म्हणाले, मिशन अभी बाकी है दोस्त

काय म्हणाले महापौर मुरलीधर मोहोळ?

'आपण सर्वांना ज्ञात आहेच की कोरोना व्हायरस हा नवीन रुपात येवून आपल्या समोर नवीन आव्हान घेवून आला आहे. याचा पुढे प्रसार होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवून याला लढा देणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पहिली पायरी म्हणून लंडन किंवा युरोपियन देशांमधून पुण्यात आलेल्या यात्रेकरूंना शोधून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून पुढील कार्यवाही करणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे.

मी 25 नोव्हेंबर नंतर पुणे शहरात लंडन किंवा युरोपियन देश येथून आलेल्या आणि आमच्या आरोग्य विभागाने संपर्क न केलेल्या अशा सर्व लोकांना आवाहन करतो की, आपण तत्काळ नजीकच्या महापालिका आरोग्य केंद्रात संपर्क करून आपली आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी आणि पुढील उपाय योजना राबविण्यास प्रशासनास सहकार्य करावे,' असं पुण्याचे महापौर यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा..पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, रात्रीच्या संचारबंदीत पोलिसांकडून अंशत: बदल

थर्टी फस्टचे सर्व कार्यक्रम टाळा...

दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. शहरात नाईट क्लब, हॉटेल्स सुरू आहेत. मात्र, तिथे सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियमांची पायमल्ली केली जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात आपणच स्वत: ची काळजी घ्यावी, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर थर्टी फस्टच्या कार्यक्रमाला जाण टाळावं, असं आवाहन देखील त्यांनी या आधीच केलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 26, 2020, 10:15 PM IST

ताज्या बातम्या