मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणीच झाली नाही? माहिती अधिकारातून वेगळाच खुलासा

समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणीच झाली नाही? माहिती अधिकारातून वेगळाच खुलासा

 मुंबई एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर नवाब मलिकांनी (Nawab Malik) जे आरोप केले आहेत त्या आरोपांचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. पण याच प्रकरणावरुन प्रशासनाला विचारलेल्या माहिती अधिकारातून एक वेगळी माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा ...
पुणे, 22 डिसेंबर : मुंबई एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे (Mumbai NCB Zonal Director Sameer Wankhede) यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी चुकीच्या कागदपत्रांच्या आधावार नोकरी मिळवली, असा दावा मलिकांनी केला होता. तसेत वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव नसून दाऊद (Dawod) असं आहे, असा आरोप मलिकांनी केला होता. त्याबाबतचे काही पुरावे देखील मलिकांनी सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले होते. पण वानखेडे कुटुंबाने ते आरोप फेटाळले होते. संबंधित प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. पण या प्रकरणावर आता एक नवी माहिती समोर आली आहे. पुण्याच्या बारामतीचे आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी शासनाच्या मुंबई जात पडताळणी समितीला माहिती अधिकाराद्वारे पत्र पाठवून याबाबत माहिती मागितली होती. त्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणीच झाली नसल्याचे त्यातून समोर आले आहे. त्यामुळे वानखेडे यांनी नोकरीत रुजू होताना कोणते प्रमाणपत्र दाखल केले? यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नितीन यादव यांची प्रतिक्रिया "राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विधी विभागामार्फत मी गेल्या दीड महिन्यांपूर्वी एक ऑनलाईन आरटीआय जमा केला होता. त्या आरटीआयमध्ये मी अशी माहिती मागवली होती की, समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने त्यांच्याकडे कोणते जात पडताळणी प्रमाणपत्र संबंधित कार्यालयातून दिले गेले आहे का? जर दिले गेले असल्यास त्याच्या साक्षीच्या प्रती मिळावी, अशी मागणी करणारा ऑनलाईन आरटीआय जमा केला होता. त्यावर मला आज एक धक्कादायक माहिती जिल्हा जातपडताळणी प्रमाणपत्र समिती मुंबई शहर कार्यालयाकडून मिळाली", असं नितीन यादव यांनी सांगितलं. हेही वाचा : 'आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे इतिहासातील पहिलं सरकार', फडणवीसांचा निशाणा "संबंधित समितीमार्फत समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने कोणतीही कास्ट वॅलिडिटी प्रमाणपत्र तयार केलेलं नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. जर समीर ज्ञानदेव वानखेडे नावाची व्यक्ती राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या सेवेत असेल तर त्या व्यक्तीने जात पडताळणी प्रमाणपत्र जमा केलं आहे की नाही? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उभा होतोय. जर त्यांनी प्रमाणपत्र सादर केलंय तर ते कोणत्या नावाने? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे", अशी प्रतिक्रिया नितीन यादव यांनी दिली.
First published:

पुढील बातम्या