अजित पवारांना भाजप किंवा रिपाइंमधून ऑफर नाही, रामदास आठवलेंचा टोला

अजित पवारांना भाजप किंवा रिपाइंमधून ऑफर नाही, रामदास आठवलेंचा टोला

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे जाणते राजे आहेत. यांची ED चौकशी करणे योग्य नसल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

  • Share this:

पुणे,27 सप्टेंबर: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शु्क्रवारी पुण्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी केली. टांगेवाले कॉलनी, अरणेश्वर, गजानन महाराज चौक, राजेंद्रनगर, आंबिल ओढा या भागाची पाहणी करून पूरगस्तांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करावी, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. त्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधला.

अजित पवारांना ऑफर नाही..

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, याबाबत माहीत नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले. मात्र, अजित पवारांना भाजप किंवा रिपाइंमधून ऑफर नाही, असा टोलाही आठवलेंनी यावेळी लगावला आहे.

शरद पवार जाणते राजे.. ED चौकशी योग्य नाही..

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे जाणते राजे आहेत. यांची ED चौकशी करणे योग्य नसल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मात्र, यात सरकार सूडबुद्धीने वागत नाही, हे सांगायलाही आठवले विसरले नाहीत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पवारांना क्लीन चिट दिली आहे.

तुम लढो सौ हमे दो नौ..

रामदास आठवले यांनी जागावाटपावर बोलताना सांगितले की, भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून अंतिम टप्प्यात चर्चा सुरू आहे. रिपाइंने 10 मागितल्या आहेत. 9 मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. 'तुम लढो सौ हमे दो नौ..', असे आठवले आपल्या शैलीत म्हणाले. सध्या निवडून यावे म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नेते भाजप-शिवसेनेत येत आहेत. भाजपमध्ये मेगा भर्ती सुरु आहे.

आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावे...

प्रकाश आंबेडकर यांना सत्तेत यायचे असेल तर त्यांनी माझ्याकडून शिकले पाहिजे,असा टोला आठवले यांनी लगावला.

VIDEO:कुणालाही न सांगता अजित पवारांनी दिला राजीनामा

Published by: Sandip Parolekar
First published: September 27, 2019, 8:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading