काँग्रेसचे युवा नेते रोहित टिळक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

काँग्रेसचे युवा नेते रोहित टिळक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

रोहित आणि या महिलेची दोन वर्षांपासून ओळख होती.रोहित यांनी लग्नाचं आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय.

  • Share this:

18 जुलै : महिलेचे शोषण केल्याच्या आरोपीखाली काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात बलeत्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही महिला टिळक यांच्या संस्थेत काम करत होती. रोहित आणि या महिलेची दोन वर्षांपासून ओळख होती.रोहित यांनी लग्नाचं आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय.

रोहित हे लोकमान्य टिळकांचा पणतु, तसेच विधान परिषदेचे माजी सभापती जयंतराव टिळकांचा नातु व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु दीपक टिळक यांचा मुलगा आहे. रोहित काँग्रेस पक्षाकडून कसबा विधानसभेचे उमेदवारही होते.

रोहित टिळक यांच्यावर भारतीय दंड विधान ३७६, ३७७, ३२३, ५०४, ५०६, ५०७ कलमांन्वये विश्रामबाग पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 11:32 AM IST

ताज्या बातम्या