अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याला नवा ट्विस्ट; रोहित पवारांनी घेतला 'हा' निर्णय

अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याला नवा ट्विस्ट; रोहित पवारांनी घेतला 'हा' निर्णय

'पवार कुटुंबीयांमध्ये कुठलाही कलह नाही किंवा भांडणही नाही. याविषयी शरद पवारांनीच सगळं स्पष्ट केलंय. त्यामुळे उगाच हा विषय काढू नका.'

  • Share this:

पुणे 27 सप्टेंबर :  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या राजीनाम्यावर शरद पवार काय बोलतात याची सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता होती. पवारांनी पुण्यात आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्याविषयीचं स्पष्टिकरण दिलं. पवारांच्या या स्पष्टिकरणामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. अजित पवारांच्या मनात राजकारण सोडण्याचा विचार आहे असे संकेत त्यांनी दिले. शरद पवार हे रोहित पवारांना पुढे करत असल्यामुळे अजित पवार हे नाराज आहेत असंही बोललं जातंय. पत्रकार परिषदेला जाताना रोहित हे शरद पवारांसोबत होते. ते त्यांच्या गाडीतच पत्रकार परिषदेच्या स्थळी आलेत. मात्र पत्रकार परिषद सुरू होताच ते घटनास्थळावरून निघून गेले. नंतर रोहित यांना जेव्हा त्याविषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले, पवार कुटुंबीयांमध्ये कुठलाही कलह नाही किंवा भांडणही नाही. याविषयी शरद पवारांनीच सगळं स्पष्ट केलंय. त्यामुळे उगाच हा विषय काढू नका असंही त्यांनी सांगितलं.

...म्हणून अजितदादांनी राजीनामा दिला, शरद पवारांनी केला मोठा खुलासा

शरद पवारांनाही नव्हती निर्णयाची कल्पना

अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झालाय. अजित पवारांनी या निर्णयाची कल्पना कुणालाच दिली नव्हती असं आता स्पष्ट झालंय. खुद्द शरद पवारांनीच पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय.  माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे अजित पवार हे अस्वस्थ होते. राजकारणाची पातळी खालावली याचंही त्यांना दु:ख होतं. ज्या शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था  उत्तमपणे चालवल्या त्या कामावरच डाग लागल्याने अजित पवार हे अतिशय अस्वस्थ होते. एवढं काम करूनही जर असं होत असेल तर त्यापेक्षा आपण शेती आणि उद्योग करू असं त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं होतं अशी माहिती शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे अजित पवारांचे हे राजकारणाचे संकेत आहेत का अशी आता चर्चा सुरू झालीय.

अजित पवारांना भाजप किंवा रिपाइंमधून ऑफर नाही, रामदास आठवलेंचा टोला

शरद पवार पुढे म्हणाले, अजित पवारांचा आक्रमकपणे आणि घाईने निर्णय घेण्याचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला असावा. माझा अजित पवारांशी संपर्क झाला नाही. मात्र कुटुंब प्रमुख म्हणून मी अजित पवारांशी बोलून त्यांची समजूत काढेण असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. यापूर्वीही कुटुंबप्रमुख म्हणून मी सांगितलेली एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरूध्द जरी असली तरी त्यांनी ती ऐकलीय. आताही ते ऐकतील असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 09:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading