मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

VIDEO: 'बाबा मला सायकल शिकवा ना' म्हणणाऱ्या मुलीचा हट्ट अखेर रोहित पवारांनी केला पूर्ण

VIDEO: 'बाबा मला सायकल शिकवा ना' म्हणणाऱ्या मुलीचा हट्ट अखेर रोहित पवारांनी केला पूर्ण

'Daddy teach me to ride a bicycle': मुलीने केला हट्ट आमदार रोहित पवार यांनी अखेर पूर्ण केला आहे.

'Daddy teach me to ride a bicycle': मुलीने केला हट्ट आमदार रोहित पवार यांनी अखेर पूर्ण केला आहे.

'Daddy teach me to ride a bicycle': मुलीने केला हट्ट आमदार रोहित पवार यांनी अखेर पूर्ण केला आहे.

    पुणे, 30 मे: लहान मुलं (Children's) म्हटलं की त्यांचे हट्ट आलेच. कुणी चॉकलेटसाठी हट्ट करतं, कुणी खेळण्यांसाठी, कुणी फिरायला जाण्यासाठी तर कुणी आणखी कशासाठी. अशाच प्रकारे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या मुलीने सुद्धा त्यांच्याकडे एक हट्ट केला आणि तो म्हणजे सायकल शिकवण्याचा (Daddy teach me to ride bicycle). वडील आमदार असल्याने त्यांना तिला सायकल शिकवण्यासाठी तितकासा वेळ मिळत नसे पण अखेर रोहित पवारांनी वेळ काढून आपल्या मुलीचा हा हट्ट पूर्ण केलाच. बाबा मला सायकल शिकवा असा हट्ट आमदार रोहित पवार यांच्याकडे आनंदिता वारंवार करत असे. मात्र, लोकप्रतिनिधी असल्याने रोहित पवार यांना मुलगी आनंदिता हिला सायकल शिकवण्यासाठी वेळ मिळत नसे. पण आता रोहित पवारांनी काल आपल्या लग्नाच्या वाढदिवासाच्या दिवशी मुलीसाठी वेळ काढला आणि तिला सायकल शिकवण्याचा हट्टही पूर्ण केला. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर पोस्ट्स ही केल्या आहेत. तसेच आपली मुलगी सायकल चालवत असल्याचा व्हिडीओ सुद्धा त्यांनी पोस्ट केला आहे. राज्यात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला; नवे नियम जाहीर, पाहा काय सुरू आणि काय बंद? आपल्या पोस्टमध्ये आमदार रोहित पवार म्हणतात, "बाबा मला सायकल शिकवा ना! हा मुलगी आनंदिताचा हट्ट अनेकदा पूर्ण करता येत नसायचा. अखेर काल तिला सायकल शिकवली आणि आज ती स्वत: सायकल चालवू लागली. यावेळी तिला आणि बाबा म्हणून कर्तव्यपूर्तीचा मलाही खूप आनंद झाला." आपल्या मुलीला सायकल शिकवल्यानंतर लगेचच ती दुसऱ्या दिवशी कुणाच्याही मदतीशिवाय सायकल चालवू लागली याबाबत रोहित पवारांनी तिचं कौतुकही केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, "ही पिढी किती स्मार्ट आहे, हेही तिने एका दिवसात सायकल चालवून दाखवून दिलं."
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: NCP, Rohit pawar

    पुढील बातम्या