Home /News /pune /

सोलापूर-पुणे महामार्गावर दरोडेखोरांनी टेम्पो लुटला; 1 कोटींच्या सिगारेट बॉक्सवर मारला डल्ला

सोलापूर-पुणे महामार्गावर दरोडेखोरांनी टेम्पो लुटला; 1 कोटींच्या सिगारेट बॉक्सवर मारला डल्ला

Crime in Solapur: मंगळवारी रात्री सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur-Pune highway) सहा ते सात अज्ञात दरोडेखोरांनी चक्क सिगरेटने भरलेला एक टेम्पो पळवून (Robbers loot tempo) नेला आहे.

    सोलापूर, 23 सप्टेंबर: रात्री अपरात्री महामार्गावर वाहनं अडवून लुटमार केल्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. यानंतर आता अशा घटनांत आणखी एक भर पडली आहे. मंगळवारी रात्री सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur-Pune highway) सहा ते सात अज्ञात दरोडेखोरांनी चक्क सिगरेटने भरलेला एक टेम्पो पळवून (Robbers loot tempo) नेला आहे. दरोडेखोरांनी टेम्पोमधील 1 कोटी रुपयांचे 250 सिगारेटचे बॉक्स लंपास (robbed 250 cigarette box worth Rs 1 crore) केले आहेत. याप्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मुमताज (रा. हैदराबाद) हा टेम्पोचालक आणि त्याचा एक साथीदार मोहम्मद इस्माईल हे दोघे, टेम्पोमधून सिगारेटचे 250 बॉक्स घेऊन पुण्याकडे येत होते. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री टेम्पो टेंभूर्णी हद्दीतील अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आला असता, सहा ते सात जणांनी संबंधित टेम्पो अडवला. हेही वाचा-पुणे: सायबर कॅफेत जाताना तरुणीसोबत घडलं विपरीत; रेल्वे रुळावर आढळला मृतदेह अज्ञात दरोडेखोरांनी टेम्पोचालक आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ दमदाटी करत, 1 कोटी रुपये किमतीचे सिगरेट बॉक्स असलेला हा टेम्पो पळवला आहे. यानंतर हा टेम्पो इंदापूर शहराजवळ रिकाम्या अवस्थेत आढळून आला आहे. या टेम्पोतील 250 सिगारेट बॉक्सची एकूण किंमत 99 लाख 37 हजार 175 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Robbery

    पुढील बातम्या