मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

जेजुरीत चोरट्यांनी पळवलं ATM; मात्र मशीन फुटलीच नाही आणि मग पुढे घडलं असं काही...

जेजुरीत चोरट्यांनी पळवलं ATM; मात्र मशीन फुटलीच नाही आणि मग पुढे घडलं असं काही...

ATM चोरट्यांनी पळवलं मात्र, मशीन न फुटल्याने चोरट्यांनी ती लपवण्याचा प्रयत्न केला.

ATM चोरट्यांनी पळवलं मात्र, मशीन न फुटल्याने चोरट्यांनी ती लपवण्याचा प्रयत्न केला.

ATM चोरट्यांनी पळवलं मात्र, मशीन न फुटल्याने चोरट्यांनी ती लपवण्याचा प्रयत्न केला.

जेजुरी, 21 मे: चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राची एटीएम मशीनच (Bank of Maharashtra ATM machine) मध्यरात्री चोरून नेल्याची घटना जेजुरी (Jejuri) एमआयडीसी परिसरात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही (Jejuri Police) तात्काळ आपला तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासांतच पोलिसांनी ही एटीएम मशीन मिळवली. सुदैवाने एटीएम मशीनमधील सर्वच्या सर्व 25 लाखांची रक्कम सुरक्षित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जेजुरी एमआयडीसी परिसरात असलेल्या एटीएम सेंटरमधील पैशांची मशीनच चोरट्यांनी चोरी केली. एटीएम मशीनला दोरखंड बांधून ती ओढत नेल्याची तक्रार जेजुरी पोलिसांत दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि शोध सुरू केला. या एटीएममध्ये सीसीटीव्ही नसल्यानेही तपासात अडचण निर्माण झाली. तसेच आसपासच्या परिसरातही सीसीटीव्हीची तपासणी केली मात्र, हाती काहीच लागले नाही.

म्युकरमायकोसिसने वाढवली पुणेकरांची चिंता; राज्यातील सर्वाधिक रुग्ण पुण्यात

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एकूण चार टीम्स तयार केल्या. यापैकी एका टीमला जेजुरी एमआयडीसी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कच्च्या रस्त्यावर पोलिसांनी एटीएम मशीनचे नट बोल्ट दिसून आले. त्यानंतर पुढे हार्ड डिस्क सुद्धा आढळून आली. त्यानंतर त्या परिसरात तपास केला असा ही एटीएम मशीनमधील पैशांची पेटी चोरट्यांनी दगडांच्या मागे लपवून ठेवल्याचं दिसून आलं.

पोलिसांनी दगड बाजूला सारून ही एटीएम मशीन बाहेर काढली. एटीएम मशीनमधील पेटी न फुटल्यानेच चोरट्यांनी ती लपवून ठेवली होती. पोलिसांनी एटीएम वेंडरला संपर्क करून ही मशीन उघडली असता त्यातील 24 लाख 88 हजार रुपयांची रोकड सुरक्षित असल्याचं कळालं.

First published:

Tags: Crime, Pune