जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Ayush prasad Accident : पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत गाडीचे टायर फुटले

Ayush prasad Accident : पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत गाडीचे टायर फुटले

आयुष प्रसाद यांच्या गाडीचा अपघात

आयुष प्रसाद यांच्या गाडीचा अपघात

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर हा अपघात झाला.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

रायचंद शिंदे, पुणे 06 जुलै : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर हा अपघात झाला. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे हा अपघात झाला आहे. घटनेत आयुष प्रसाद यांच्या इनोव्हा कारला ट्रकने धडक दिली. या धडकेत इनोव्हा कारचे दोन्ही टायर फुटले. मात्र फक्त देव बलवत्तर म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या अपघातातून वाचले. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेले अंगरकक्षही या अपघातातून बचावले. पुण्यावरून जुन्नर येथे केंद्रीय सचिव दौऱ्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे. मंचर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली गेली आहे. Dhule Accident : कंटेनर कारला उडवून हॉटेलमध्ये शिरला, 9 जणं जागीच गेले; थरकाप उडवणारं CCTV फुटेज बुधवारी दुपारी 12.30 चे सुमारास पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे इनोव्हा कारने जुन्नरला महत्त्वाच्या कामासाठी जात होते. यावेळी मंचर शहर सोडल्यानंतर एकलहरे हद्दीत एका ट्रक चालकाने त्यांचे वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि गाडी त्यांच्या बाजूने दाबली. परंतु चालक दीपक शिंदे यांनी अपघात होऊ नये यासाठी ब्रेक दाबले. यात डिव्हायडरला धडकून पुढील डाव्या व उजव्या बाजूचे दोन्ही टायरचा स्फोट होऊन गाडी 30 फूट डिस्कवर घासत गेली वाहन चालक शिंदे यांनी मोठ्या शिताफीने गाडी कंट्रोल केली . घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर आणि इतर अधिकारी घटनास्थळी हजर झाले आणि आयुष प्रसाद यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या वाहनामध्ये पोलीस,आयुष प्रसाद ,त्यांचे अंगरक्षक पोलीस हवालदार संजीव रामू पाटील प्रवास करत होते . राज्यात अपघातांची मालिका -  राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यानंतर नुकतंच मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळील अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. या घटेनत ब्रेक फेल झाल्याने कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरला. या दुर्घटनेत 9 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला तर तर पंधरा ते वीस जणं जखमी झाले. या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी मोठ्या संख्येत जमाव एकत्र आला होता. हा अपघात इतका भीषण होता की, 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह रस्त्यावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात