S M L

आर्ची उर्फ रिंकू अकरावीला पुण्यातच घेणार अॅडमिशन

बालगंधर्व रंगमंदिराच्या 50व्या वर्धापन दिनानिमितानं सैराटच्या टीमची प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीत रिंकूनं ही माहिती दिली.

Sonali Deshpande | Updated On: Jun 25, 2017 08:45 PM IST

आर्ची उर्फ रिंकू अकरावीला पुण्यातच घेणार अॅडमिशन

25 जून : आर्ची उर्फ रिंकू राजगुरू दहावीनंतर काय करणार असा नवा प्रश्न तिच्या फॅन्सना पडला असेल. पण आता या सस्पेंन्सवरुनही पडदा उठलाय. कारण आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू पुण्याच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. ही माहिती खुद्द रिंकू राजगुरूनं दिलीये.

बालगंधर्व रंगमंदिराच्या 50व्या वर्धापन दिनानिमितानं सैराटच्या टीमची प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीत रिंकूनं ही माहिती दिली. कोणत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार हे नक्की नसल्याचंही तिनं सांगितलं. तर परश्या म्हणजेच आकाश ठोसर हा पुणे विद्यापीठातून एमए करीत असल्याचं त्यांनं सांगितलं.

नाट्य समीक्षक राज काझी यांनी सैराट टीमची मुलाखत घेतली ,त्यावेळी सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजूळे यांना सैराटची कॉपी होतेय त्याबाबतचं मत विचारलं असता ते म्हणाले,त्याबाबत आपल्याला काही माहीत नाही,तसं झालं तरी मला काही म्हणायचं नाही.सैराटमध्ये अडकून पडण्यापेक्षा मला दुसरं काही तरी करायचं आहे.असं सांगत असतानाचं इथल्या सामान्य माणसांची भाषा चित्रपटात आली पाहिजे ,असा माझा आग्रह आहे.कारण भाषेचे संकेत मला मान्य नाहीत,असंही मंजुळे यावेळी म्हणाले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2017 08:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close