• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • दिवाळीनंतर पुणेकरांचा खिसा होणार अधिक रिकामा; पेट्रोल-डिझेलबरोबर याचीही भर

दिवाळीनंतर पुणेकरांचा खिसा होणार अधिक रिकामा; पेट्रोल-डिझेलबरोबर याचीही भर

दिवाळीनंतर पुणेकरांना महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे.

  • Share this:
पुणे, 14 ऑक्टोबर : देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांच्या (Citizens suffer due to rising petrol-diesel prices) नाकी नऊ आले आहेत. त्यात गेल्या अनेक दिवसांपासून भाज्याही महागल्या आहेत. आता पुणेकरांना आणखी एक फटका सहन करावा लागणार आहे. पुण्यातील (Pune News) प्रवास आता महागणार असल्याचं समोर आलं आहे. पुणेकरांना रिक्षा प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार (Pune residents will have to pay more for rickshaw travel) असल्यातं वृत्त समोर आलं आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. त्यात कोरोनाचं संकट अद्यापही डोक्यावर घोंगावत आहे. त्यात आदा पुणेकरांचा रिक्षा प्रवास 2 रूपयांनी महागणार आहे. पहिल्या 1.50 किलोमीटरसाठी 18 रूपयांऐवजी आता 20 रूपये मोजावे लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच प्रतीमीटर भाडे 12 रूपयांऐवजी 13 रूपये मोजावे लागणार आहे. ही नवीन भाडेवाढ 8 नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 5 वर्षांनंतर पुण्यात रिक्षांचे भाडे महागणार आहे. पुणे आरटीओ डॉ. अजित शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली. हे ही वाचा-पुणे-मुंबईसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू, आता प्रवास होणार अवघ्या 40 मिनिटांत दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा सर्वसामान्यांना झटका दिला आहे. आज गुरुवारी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price) दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोल दर 35 पैसे, तर डिझेलही 35 पैशांनी महागलं आहे. या वाढीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर 104.79 रुपये, तर डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर झालं आहे. सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेल किंमतीत सतत वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून इंधन दर चढाच आहे. या महिन्यात केवळ 10 दिवसांत पेट्रोल दर 2.80 रुपयांनी महागलं आहे, तर डिझेल दरात 3.30 रुपये वाढ झाली आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: