मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

चुकून बँक खात्यात आलेली 32 लाखाची रक्कम केली परत; पुरंदरमधील महिला उद्योजकावर कौतुकाचा वर्षाव

चुकून बँक खात्यात आलेली 32 लाखाची रक्कम केली परत; पुरंदरमधील महिला उद्योजकावर कौतुकाचा वर्षाव

Pune News: नजर चुकीने बँक खात्यात आलेली 32 लाख 68 हजार 85 रुपयांची रक्कम पुरंदरमधील महिलेनं चार महिन्यांनी प्रामाणिकपणे परत केली आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

  • Published by:  News18 Desk
पुरंदर, 02 जून: पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील रहिवासी असणाऱ्या अश्विनी अमोल वाघोले यांच्या बँक खात्यावर काही दिवसांपूर्वी अचानक 32 लाख 68 हजार 85 रुपयांची रक्कम जमा झाली होती. नजर चुकीने आलेली ही रक्कम चार महिन्यांनी वाघोले यांनी प्रामाणिकपणे परत केली आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. खरंतर अश्विनी अमोल वाघोले यांच्या मालकीच्या असणाऱ्या यशोधन एच पी गॅस एजन्सीच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा झाली होती. 5 मे रोजी रक्कम जमा झाल्यानंतर बँकेला सलग तीन दिवस सुट्टी असल्याने संबंधित रक्कम कोणाच्या खात्यातून आली याबद्दल काही माहिती मिळाली नाही. मंगळवारी बँक पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांनी बँकेतील अधिकाऱ्यांकडे संबंधित खात्याबद्दल चौकशी केली. पण बँकेतील कर्मचाऱ्यांने तुमच्या खात्यावर आलेली रक्कम कोणाची आहे, हे आम्हालाही माहित नाही, खात्याची पडताळणी करून कळवतो, असं सांगितलं. त्यावेळी अश्विनी वाघोले आणि अविनाश वाघोले यांनी कागदोपत्री व्यवहार करून संबंधित रक्कम परत पाठवण्याची विनंती बँकेला केली. पण मागील चार महिन्यांपासून ही रक्कम वाघोले यांच्या बँक खात्यातचं पडून होती. शिवाय ज्या कंपनीकडून ही रक्कम त्यांच्या खात्यात आली होती. त्यांनीही कोणतीचं चौकशी केली नव्हती. पण काल अखेर बँकेने नजर चुकीने आलेली रक्कम संबंधित कंपनीच्या खात्यात परत पाठवली आहे. हे ही वाचा-आयकर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7 जूनला लाँच होणार नवीन Income Tax पोर्टल वाघोले यांच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात. मागील चार महिन्यांपासून कंपनीची 32 लाख 68 हजार 85 रुपयांची रक्कम नजर चुकीने वेगळ्याचं अकाऊंट गेली असतानाही, संबंधित कंपनीने यशोधन एच पी गॅस एजन्सीकडे साधी चौकशीही केली नाही. असं असताना वाघोले कुटुंबीयांनी ही रक्कम परत केली आहे.
First published:

Tags: Maharashtra, Mumbai, Pune, Woman

पुढील बातम्या