मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

कोरोनातून झाले बरे, परंतु... एकनाथ खडसेंच्या मागे पुन्हा ED चं चक्र; उद्या होणार चौकशी

कोरोनातून झाले बरे, परंतु... एकनाथ खडसेंच्या मागे पुन्हा ED चं चक्र; उद्या होणार चौकशी

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे.

    मुंबई, 14 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते एकनाख खडसे (Eknath Khadse) यांची उद्या सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी होणार असल्याची बाब समोर आली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे. काही दिवसांपूर्वी खडसेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. परिणामी त्यांना क्वारंटाईन व्हावं लागतं होतं. (Eknath Khadse to be questioned by ED tomorrow) अखेर उद्या त्यांचा क्वारंटाईन पीरिएड संपणार असल्याने त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे. म्हणून लागला चौकशीचा ससेमिरा... भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यामागे EDच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ED च्या नोटिशीनंतर एकनाथ खडसेंची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपली ED कडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज खडसेंनी याआधी व्यक्त केला होता. 'त्यांनी ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी भाजपला उद्देशून दिला होता. त्यामुळे आता खरंच एकनाथ खडसे सीडी लावतात का? आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Eknath Khadse to be questioned by ED tomorrow) हे ही वाचा-राजकीय प्रेमप्रकरणं आणि बरचं काही; धनंजय मुंडेंप्रमाणे कोणते नेते होते चर्चेत? पुण्यात भोसरी जमीन (Bhosari MIDC land purchase) घोटाळ्याप्रकरणी खडसेंची चौकशी केली जाणार आहे. ही जमीन अब्बास उकानी नावाच्या व्यक्तीकडून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधऱी यांनी तब्बल 3 कोटी 75 लाखांना खरेदी केली होती. या प्रकरणात स्टॅम्ब ड्यूटीसाठी 1 कोटी 37 लाख भरण्यात आले होते. यावेळी खडसे महसूल मंत्री होते. त्यामुळे पदाचा गैरवापर करुन त्यांच्या कुटुंबीयाने ही जमीन खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath khadse

    पुढील बातम्या