कोरोना बाधितांच्या संख्येने पुणे हादरलं, 24 तासांत आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ

कोरोना बाधितांच्या संख्येने पुणे हादरलं, 24 तासांत आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ

मुंबई आणि राज्यात कोरोना रुग्णांचा होणारा गुणाकार आजही कायम राहिला आहे. राज्यात आजही उच्चांकी २४२६ नवे रुग्ण सापडले.

  • Share this:

पुणे 25 मे: पुणे शहरात आज रेकॉर्डब्रेक कोरोना रुग्णांची नोंद झाली. 24 तासांत दिवसभरात कोरोनाचे 399 नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 5 हजारांच्या वर गेला आहे. दिवसभरात कोरोनाचे 10 बळी गेलेत. त्यामुळे पुण्यातील मृतांचा आकडा 264 वर गेलाय.  तर बाधितांची एकूण संख्या 5181 एवढी झाली आहे. कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या 175 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.यातील बरे झालेल्यांची रुग्णसंख्या 2735 एवढी झालीय. तर सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 2182 आहे. गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांची संख्या 179 एवढी आहे.

मुंबई आणि राज्यात कोरोना रुग्णांचा होणारा गुणाकार आजही कायम राहिला आहे. राज्यात आजही उच्चांकी २४२६ नवे रुग्ण सापडले. तर ६० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ५२६६७ एवढी झाली आहे. त्यात ॲक्टिव्ह केसेस ३५१७८ एवढ्या आहेत. तर आज ११८६ जणांचा डिस्चार्ज मिळाला. मुंबईत २४ तासांमध्ये १४३० रुग्ण वाढले आहेत. दरम्यान रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने सुविधांची मोठ्या संख्येने निर्मिती सुरू केली आहे.

बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल ( १००० बेड्सची जम्बो सुविधा ). याचठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही तिथे आहेत.

लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जाऊ लागलीत लहान मुलं; कारण वाचून व्हाल हैराण

महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु. ६०० बेड्सची सुविधा यात १२५ बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोविड १९च्या मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल. नेसको गोरेगाव येथे ५३५ बेड्सची सुविधा असलेली जम्बो सुविधा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

मुंबईवरून पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवलं, आरोपीला अटक

रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील २ आठवड्यात तयार होणार आहे.

 

First published: May 25, 2020, 9:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading