आईशी भांडण करून घराबाहेर पडली तरुणी.. नराधमाने घेतला याच संधीचा फायदा

आईशी भांडण करून घराबाहेर पडली तरुणी.. नराधमाने घेतला याच संधीचा फायदा

पीडित तरुणी रविवार पेठेत राहते. घटना घडली त्या दिवशी तिचे आईसोबत कडाक्याचे भांडण झाले होते.

  • Share this:

पुणे,20 सप्टेंबर: पुण्यातील घोरपडी रेल्वे स्टेशनजवळ एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (18 सप्टेंबर) ही घटना घडली. याप्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीवरून वानवडी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईशी भांडण करून घराबाहेर पडली होती तरुणी..

मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी रविवार पेठेत राहते. घटना घडली त्या दिवशी तिचे आईसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. संतापाच्या भरात ती घराबाहेर पडली होती. पुणे रेल्वे स्टेशनवर येऊन ती बंगळुरूकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये बसली. तिकीट नसल्याने टीटीने तिला कराड रेल्वेस्थानकात उतरण्यास सांगितले होते. पीडित तरुणी कराड रेल्वेस्थानकात उतरून पुन्हा पुण्याकडे येण्यासाठी पॅसेंजरमध्ये बसली. रेल्वेत तिला एक तरुण भेटला. त्याने तिला घरी सोडतो, असे सांगितले. मात्र, नराधमाने तरुणीला आधी घोरपडी रेल्वेस्टेशनवर नेले. त्यानंतर तिथून त्याने तरुणीला एका खोलीवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिला रात्री तिला रस्त्यावर सोडून तो फरार झाला. पीडित तरूणीने थेट पोलिस स्टेशन गाठून अज्ञात नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. पीडितेवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.

VIDEO:युतीचा फॉर्म्युला अजून हवेतच? चंद्रकांत पाटील म्हणाले...

Published by: Sandip Parolekar
First published: September 20, 2019, 9:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading