पुणे हादरलं! मावस बहिणींचं अपहरण करून दोन नराधमांकडून लैंगिक अत्याचार

पुणे हादरलं! मावस बहिणींचं अपहरण करून दोन नराधमांकडून लैंगिक अत्याचार

लैंगिक अत्याचाराच्या (sexual assault) घटनेनं पुणे (Pune) पुन्हा एकदा हादरलं आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 17 डिसेंबर: लैंगिक अत्याचाराच्या (sexual assault) घटनेनं पुणे (Pune) पुन्हा एकदा हादरलं आहे. मावस बहिणींचं अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये  (Pimpri chinchwad) समोर आली आहे. 15 डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन नराधमांनी हे कृत्य केलं असून या कामात त्यांना तीन मित्रांनी मदत केली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police) पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही पीडित मुली अल्पवयीन आहेत.

आशिष सरोदे (वय-20), करण साबळे (वय-21), निवास सुतार (वय-20), तेजस वाघमारे (वय-19) आणि कार्तिक उर्फ टिंक्या चव्हाण (वय-21) अशी आरोपींची नावं आहेत.

हेही वाचा..बांगलादेशी तरुणीने दिला धोका, 3 आठवड्यांनी आढळला फ्लॅटमध्ये कुजलेला मृतदेह

मिळालेली माहिती अशी की, आरोपी आशिष सरोदे आणि करण साबळे या दोघांनी एका मुलीवर बलात्कार केला तर दुसरीचा विनयभंग केला. त्यानंतर नराधमांनी आपल्या तीन मित्रांना बोलावून त्यांच्या मदतीनं मुलींचं अपहरण केलं. मात्र, स्थानिक नागरिकांमुळे त्यांचा कट फसला. आरोपींनी दोन्ही पीडितांना रस्त्यावर सोडून पळ काढला. मात्र, पोलिसांनी नराधमांना अवध्या काही तासांतच जेरबंद केलं.

काय आहे प्रकरण?

पिपंरी चिंचवडमधील अजंठा नगरमध्ये 15 डिसेंबरला रात्री दोन्ही मावस बहिणी खेळत होत्या. आरोपी आशिष सरोदे आणि करण साबळे हे दोघं तिथं आले. आरोपींनी दोन्ही पीडितांची विचारपूस केली. नंतर आंधाराचा फायदा घेत घराशेजारी असलेल्या जुन्या कंपनीच्या परिसरात नेऊन आरोपी आशिष सरोदे यांनी एका मुलीवर बलात्कार केला तर दुसरा आरोपी करण साबळे यानं दुसऱ्या पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न केला. तरी देखील नराधम थांबले नाहीत, त्यांनी दोन्ही पीडितांना जुन्या पुणे-मुंबई हायवेवर आणलं. आपल्या तिन्ही मित्रांनी तिथं बोलावलं. नंतर कारमध्ये पीडितांना जबरदस्तीनं बसवून त्यांच अपहरण केलं. मात्र, चिंचवड स्टेशन चौकात वाहतूक पोलिसांनी कार थांबवली असता आरोपींनी दोन्ही पीडितांना रस्त्यवर उतरवून पाचही आरोपी पसार झाले.

हेही वाचा..पुण्यात अधिकाऱ्याचा राजीनामा, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शरद पवार थेट साताऱ्यात

पीडित मुलींनी आपलं घर गाठून नातेवाईकांनी आपबिती सांगितलं. नातेवाईकांनी निगडी पोलीस स्टेशनमध्ये घाव घेवून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पाचही आरोपींना काही तासात जेरबंद केलं.

Published by: Sandip Parolekar
First published: December 17, 2020, 1:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading