गोळ्या बिस्कीटं खरेदीसाठी आलेल्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न

गोळ्या बिस्कीटं खरेदीसाठी आलेल्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न

पीडित चिमुरडी टपरीवर गोळ्या बिस्कीटं खरेदीसाठी आली असता तिला आरोपीने टपरीत नेले.

  • Share this:

बाळासाहेब काळे,(प्रतिनिधी)

पुरंदर,4 डिसेंबर: हैदराबादेतील डॉ.प्रियांका रेड्डी बलात्कार प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली असताना गोळ्या बिस्किटांच्या टपरीत 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 60 वर्षांच्या नराधमाला अटक पोलिसांनी अटक केली आहे. खानवडी (ता.पुरंदर) येथे ही घटना घडली आहे. सासवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खानवडी येथील चौफुलीवर आरोपी नाना दिनकर दोडके (वय-60, रा.बेलसर) याचे गोळ्या बिस्किटांची टपरी आहे. पीडित चिमुरडी टपरीवर गोळ्या बिस्कीटं खरेदीसाठी आली असता तिला आरोपीने टपरीत नेले. तिच्यावर त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. 30 नोव्हेंबरला ही घटना घडली होती. पीडित चिमुरडी कुटुंब मेंढपाळ कुटुंबातील आहे. अतिप्रसंगानंतर चिमुरडील त्रास झाल्याने तिला सासवड येथील दवाखाण्यात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. एवढेच नाही तर पीडित कुटुंबाला पोलिसांत जाण्याचा सल्लाही दिला. या कुटुंबाने सासवड पोलिस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तत्कार केली. पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असून तिने आपबिती सांगितली. सासवड पोलिसांनी आरोपी नाना दोडके यास अटक केली आहे. आरोपीवर बलात्काराचा प्रयत्न, बाललैंगिक अपराध प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांनी दिली आहे.

बाप नावाला कलंक.. पोटच्या 16 वर्षीय मुलीवरच केले दुष्कर्म

बुलडाणा जिल्ह्यात अंढेरा पोलिस स्टेशनअंतर्गत मन हेलावून टाकणारी घटना घडली. जन्मदात्या बापानेच आपल्या 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित मुलीची पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.

पोटच्या मुलीवर मागील दोन महिन्यांपासून झोपेच्या गोळ्या खाऊ घालून लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. पीडित मुलीला सावत्र आई असून तिला आपबिती सांगितल्यानंतर ही तिने गप्प राहण्यास सांगितले. शिवाय तिला मारहाण ही केली. मात्र, दररोज होणारा अत्याचार सहन न झाल्याने पीडित मुलीने दोन दिवसांपूर्वी आपले घर सोडले होते. दरम्यान, ही मुलगी चिखली शहरात फिरत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांना आढळून आली. तिला विचारपूस केल्यानंतर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती कार्यकर्त्यांना दिली. बापाने आपल्या मुलीवर केलेल्या दुष्कर्मांची माहिती कार्यकर्त्यांनी पीडितेला घेऊन अंढेरा पोलीस स्टेशन गाठून तिथे रितसर तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2019 07:57 PM IST

ताज्या बातम्या