Minor Girl Rape and Murder: गेल्या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातील पाणशेत परिसरात एका अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कारानंतर नराधमाने तिची निर्घृण हत्या केली होती.
पुणे, 01 मार्च: गेल्या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी पुणे (Pune) जिल्ह्यातील पाणशेत परिसरात एका अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape on minor) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपीनं पीडित मुलीला पैसे आणि खाऊ देण्याचं आमिष दाखवून तिला पळवून नेलं होतं. यानंतर नराधमाने चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या (Brutal murder) केली होती. संपूर्ण जिल्ह्याला हादरवणारी ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी अवघ्या 48 तासात नराधमाच्या मुसक्या आवळल्या (Accused arrested) होत्या.
हा खटला न्यायालयात गेल्यानंतर काल 28 फेब्रुवारी 2022 रोजी न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा (Death penalty) सुनावली आहे. बलात्कार आणि हत्येचा घटनेनंतर एक वर्षानं चिमुकलीला अखेर न्याय मिळाला आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश संजय देशमुख यांनी जलदगतीने हा खटला सुरू केला. त्यानंतर काल 28 फेब्रुवारी रोजी पुणे विशेष न्यायालयानं आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय बबन काटकर असं दोषी आढळलेल्या नराधमाचं नाव आहे.
हेही वाचा-पत्नीवर संशय घेतला अन् स्वत:च रेपच्या गुन्ह्यात झाला गजाआड, पालकांवरही FIR दाखलत्यादिवशी नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी 2021 रोजी अडीच वर्षीय पीडित मुलीचे आई वडील पुण्यानजीक असणाऱ्या पाणशेत याठिकाणी रोजंदारीवर काम करत होते. दरम्यान या दाम्पत्याची अडीच वर्षांची मुलगी आसपास खेळत होता. यावेळी नराधम दोषी संजय काटकर याठिकाणी आला. त्यानं पीडित मुलीला पैसे आणि बिस्किट देण्याचं आमिष दाखवत तिचं अपहरण केलं. यानंतर आरोपी पीडितेला मालखेड ते थोपटेंवाडी परिसरात निर्जनस्थळी घेऊन गेला.
हेही वाचा-पैशांसाठी सासरच्यांनी विवाहितेला पाजलं अॅसिड, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं!
याठिकाणी त्यानं क्रूरतेचा कळस गाठत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं पीडित मुलीची निर्घृण हत्या केली. आणि येथीलच एका मोरीत चिमुकलीचा मृतदेह टाकून नराधमाने पळ काढला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर वेल्हा पोलिसांनी अवघ्या 48 तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. विविध पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. विविध पुरावे आणि साक्षीदारांचा पाठपुरावा केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.