• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • राणे Vs सेना 'सामना' सुरूच, नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका

राणे Vs सेना 'सामना' सुरूच, नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका

 'नारायण राणेंना अटक राजकीय सुडबुद्धीतूनच होती. आता अनिल परबांना ईडीची नोटीस मिळाली तर लगेच किंकाळ्या सुरू झाल्या'

'नारायण राणेंना अटक राजकीय सुडबुद्धीतूनच होती. आता अनिल परबांना ईडीची नोटीस मिळाली तर लगेच किंकाळ्या सुरू झाल्या'

'नारायण राणेंना अटक राजकीय सुडबुद्धीतूनच होती. आता अनिल परबांना ईडीची नोटीस मिळाली तर लगेच किंकाळ्या सुरू झाल्या'

  • Share this:
खेड, 31 ऑगस्ट : 'संजय राऊत (sanjay raut) सारखी माणसं बोलण्यासाठी बाजारात पैसे देऊन विकत मिळतात, ज्याला स्वत:ला माहित नाही मी ठाकरेंचा की पवारांचा लो लोमत्या. हेच माहित नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं? असं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे (bjp mla Nitesh Rane) यांनी टीका केली. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भाजप कार्यालयाला भेट देण्यासाठी नितेश राणे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना राणे यांनी राऊत यांना टोला लगावला. 'महाविकास आघाडीत बसलेल्या बैलांना जोपर्यत तुम्ही राज्यातून पळवत नाही तोपर्यंत बैलगाडा शर्यंत सुरु होणार नाही' बैलगाडा शर्यतबंदीवर पर्यायी मार्ग काढण्याचे राज्यसरकारचे काम आहे मात्र राज्य सरकारने बैलगाडा शर्यतबंदीवर नियोजित अडचण कशी उभी करायची हे दाखवून दिलं असं म्हणत बैलगाडा शर्यतबंदीवर नितेश राणेंनी राज्य सरकारला लक्ष केलं. Tokyo Paralympics : मरियप्पन-शरदचा डबल धमाका, भारताची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी 'नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहे. राजशिष्टाचारनुसार आपला देश चालतो. कायदाला सहकार्य करुनच आम्ही वागतोय. दिल्लीत काही नियोजित बैठका होत्या. त्या बैठकांना उपस्थिती महत्वाची होती त्यामुळे राणे साहेब दिल्ली दौऱ्यात गेले आहे' असंही राणे म्हणाले. 'पुरोगामी महाराष्ट्रात राड्याची संस्कृती उदयास येते की काय असा संघर्ष राणे विरुद्ध शिवसेनेत मागील आठ दिवसांपासून सुरू आहे. सुरुवात त्यांनी केलीय नारायण राणेंना कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन अटक करत रत्नागिरीत तमाशा सुरू केला. हा खेळ त्यांनी सुरू केला असून तो संपवायला आम्हालाच लागणार, असं म्हणत पुन्हा एकदा नितेश राणेंनी शिवसेनेला आव्हान दिलं. सोने दरात घसरण सुरूच; सणासुदीला बायकोला खूश करण्याचा गोल्डन चान्स 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवळलं आहे. ते बोलूच शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा असताना हिंदू धर्माच्या सणांवर बंदी येते कसा आणि किती अन्याय करतोय, असं म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला. 'नारायण राणेंना अटक राजकीय सुडबुद्धीतूनच होती. आता अनिल परबांना ईडीची नोटीस मिळाली तर लगेच किंकाळ्या सुरू झाल्या हे राजकीय सुडबुद्धीतून आहे. हे आमची सत्यनारायणाची पुजा घालतात आणि आम्ही केलं तर राजकीय सुडबुद्धी, अशी टीकाही त्यांनी केली.
Published by:sachin Salve
First published: