मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे तिथे वाद उणे, उदय सामंत येण्याआधीच रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराला स्थगिती!

पुणे तिथे वाद उणे, उदय सामंत येण्याआधीच रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराला स्थगिती!

मराठी पत्रकारांसाठी शैक्षणिक पंढरी अशी ओळख असलेलं पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट गेल्या आठवड्याभरात स्थलांतर वादामुळे राज्यभरात गाजत होतं.

मराठी पत्रकारांसाठी शैक्षणिक पंढरी अशी ओळख असलेलं पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट गेल्या आठवड्याभरात स्थलांतर वादामुळे राज्यभरात गाजत होतं.

मराठी पत्रकारांसाठी शैक्षणिक पंढरी अशी ओळख असलेलं पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट गेल्या आठवड्याभरात स्थलांतर वादामुळे राज्यभरात गाजत होतं.

पुणे, 13 ऑगस्ट : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) रानडे इनस्टिट्यूट (Ranade Institute) स्थलांतर वादावर अखेर तात्पुरता पडदा पडला आहे. रानडे इनस्टिट्यूटच्या स्थलांतर प्रस्तावास अखेर स्थगिती मिळाली आहे. पुणे विद्यापीठानेच यासंंबंधीचं प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा केला आहे. असं असलं तरीही उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत उद्या रानडे इनस्टिट्यूटला भेट देणारच आहेत आणि आंदोलक विद्यार्थ्यांची बाजू देखील ऐकूण घेणार आहेत. स्वत: उदय सामंत यांनीच तसं ट्विट केलंय.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या प्रकरणी दखल घेतली होती. तसंच, ते शनिवारी रानडे इन्स्टिटूटची पाहणी करणार होते. पण उदय सामंत यांच्या दौऱ्याआधीच विद्यापीठाकडून निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.  एकत्रीकरण आणि स्थलांतर दोन्ही निर्णय रद्द करण्यात आले आहे. शनिवारी रानडेत उदय सामंत विद्यार्थ्यांशी चर्चा करणार होते. पण,  त्याआधीच विद्यापीठाकडून निर्णय स्थगित देण्यात आली आहे.

मराठी पत्रकारांसाठी शैक्षणिक पंढरी अशी ओळख असलेलं पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट गेल्या आठवड्याभरात स्थलांतर वादामुळे राज्यभरात गाजत होतं.  पुणे विद्यापीठाच्या काही सिनेटर्सनी फर्ग्युसन कॉलेजवरील हे डिपार्टमेंट विद्यापीठ कॅम्पसमध्ये स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण या निर्णयामागे यामागे या  रानडे इनस्टिट्यूटची मोक्याची जागा एका बिल्डरच्या घशात घालण्याचा गंभीर आरोप माजी विद्यार्थ्यांनी केल्याने या वादाला गंभीर वळण लागलं होतं.

अभिनेत्रीचा Private MMS video झाला लीक; सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

बाजारभावाप्रमाणे या जागेची किंमत 400 कोटीच्या घरात असल्यानेच काही सिनेटर्स हे रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतरीत करू पाहत असल्याचा आरोप झाल्याने अनेक माजी विद्यार्थी पेटून उठले त्यांनी रानडे इनस्टिट्यूट बचाव कृती समिती स्थापन करत या कुलगुरूंना निवेदनही दिलं त्यानंतर शिवसेनेची युवा शाखा ही या आंदोलनात उतरली, त्यांनीही कुलगुरूंना निवेदन दिलं.

या रानडे स्थलांतर वादाचं गांभिर्य लक्षात येतात उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही स्वत:हून हस्तक्षेप करत आपण विद्यार्थी आंदोलकांच्या पाठिशी ठामपणे उभा राहू, अशी भूमिका जाहीर केली. एवढंच नाहीतर शनिवारी या रानडे इन्स्टिट्यूटला भेट देत असल्याचं घोषित करून टाकलं. पुणे पत्रकार संघानेही रानडे स्थलांतरात विरोध दर्शवला कारण इथला डिप्लोमा कोर्स हा पुणे श्रमिक पञकार संघामार्फतच चालवला जातोय. एकूणच वाढता विरोध लक्षात येताच आज अखेर साविञीबाई फुले पुणे विद्यापाठीकडून एक प्रसिद्धीपत्रक काढून रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतर प्रस्तावास तात्पुरती स्थगिती देत असल्याचा खुलासा केला गेला.

महापौरांनी दाताने चावल्यामुळे तुटलं Olympic Medal, सोशल मीडियावर संतापाची लाट

पण या पत्रकातील भाषा ही काहिशी गोंधळात टाकणारी म्हणून मग न्यूज 18 लोकमत च्या प्रस्तुत प्रतिनिधींनी विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल पवार यांचीशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी रानडे स्थलांतरास स्थगिती दिलीय, असं स्पष्टपणे सांगितले. पण तरीही उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हे उद्या रानडे डिपार्टमेंटला भेट देणार असून माजी विद्यार्थी कृती समितीच्या यासंबंधीच्या भावना जाणून घेणार आहेत. याचाच अर्थ या स्थलांतर प्रस्तावात नेमकं काय काळंबेरं तर नव्हतं ना हे जाणून घेण्याची मंत्रीमहोदयांची इच्छा दिसतेय. यावर आंदोलक विद्यार्थ्यांनी आता या रानडे इन्स्टिट्यूटचं फक्त स्थलांतरच थांबवून चालणार नाही तर या पञकारिता विभागाला अभिमत दर्जा देण्याची मागणी पुढे केलीय.

First published: