चोरीला गेलेल्या गाड्या शोधण्याचा अनोखा छंद,3 वर्षांत शोधून दिल्या तेराशे गाड्या

चोरीला गेलेल्या गाड्या शोधण्याचा अनोखा छंद,3 वर्षांत शोधून दिल्या तेराशे गाड्या

पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारे रामराव उदावंत चोरीला गेलेल्या गाड्या शोधून देतात.

  • Share this:

08 आॅक्टोबर : गाडी चालवण्याची आवड अनेकांना असते. पण चोरीला गेलेल्या गाड्या शोधून देण्याचा छंद कधी ऐकलाय? आता ऐका, पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारे रामराव उदावंत चोरीला गेलेल्या गाड्या शोधून देतात. तुम्ही म्हणाल, अशा कितीशा गाड्या शोधल्या असतील यांनी ? फक्त 3वर्षांत तब्बल तेराशे वाहनांचे खरे मालक त्यांनी आतापर्यंत शोधून दिलेत.

या कामासाठी त्यांनी रीतसर एक संस्थाच सुरू केलीय. 'गंगामाता वाहन शोध संस्था' नावाची. त्यांना आम्ही विचारलं, की हे काम का करता, तर ते म्हणाले फक्त आनंदासाठी. चार वर्षांपूर्वी त्यांची स्वतःची गाडी चोरीला गेली, आणि तिथून त्यांना ही आयडिया मिळाली.

First published: October 8, 2017, 2:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading