रक्षाबंधनला बहिणीनं भावाला गिफ्ट केलं यकृत, अनोख्या नात्याची अनोखी कहानी

रक्षाबंधनला बहिणीनं भावाला गिफ्ट केलं यकृत, अनोख्या नात्याची अनोखी कहानी

शंकर नलावडे यांना आज जीवदान मिळणार आहे. आणि राखीपिर्णिमेचा हा सण खऱ्या अर्थाने अनोख्या पद्धतीने साजरा होणार आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 03 ऑगस्ट : बहीण भावाच नातं अतूट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. खरंतर आजच्या दिवशी भाऊ नेहमी पाठीशी उभा असतो. म्हणून बहीण त्याची ओवाळणी करते. मात्र, एक बहीण चक्क आपल्या भावाला स्वतःचं यकृत देऊन त्याला जीवनदान देण्यासाठी उभी राहली आहे. पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आता पार पडतेय.

सावित्रा भोसले असं यकृत देणाऱ्या बहिणीचं नाव असून त्यांचे बंधू शंकर नलावडे यांना आज जीवदान मिळणार आहे. आणि राखीपिर्णिमेचा हा सण खऱ्या अर्थाने अनोख्या पद्धतीने साजरा होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आळजपूरचे पोलीस पाटील असलेले 59 वर्षीय शंकर नलावडे यांचं यकृत खराब झालं आहे. विविध तपासण्या केल्यानंतर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय असल्याचे समोर आले. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या काळात यकृत प्रत्यारोपणासाठी सरकार दरबारी नोंद झालेले दाते उपलब्ध होईनात.

त्यामुळे करायचं काय, असा प्रश्न नलावडे कुटुंबीयासंमोर निर्माण झाला. नलावडे यांच्या चार बहिणी आणि पत्नी या पाच महिलांनी अखेर पुढाकार घेऊन स्वतःचे यकृतदान करण्याची तयारी दाखवली. त्यासाठी आवश्यक तपासण्या आणि चाचण्या झाल्यानंतर नलावडे यांची बहीण सावित्रा भोसले यांचे यकृत नलावडे यांच्यासाठी उपयोगी ठरू शकते, यावर डॉक्टरांनी शिक्कामोर्तब केला आणि त्यासाठी सोमवारचा दिवस ठरला.

तुमचे नातेवाईक किंवा मित्र जर विदेशात असतील तर त्यांच्यासाठी आहेत आता नवीन नियम

योगा योगाने सोमवारी म्हणजे आज

राखीपौर्णिमेच्या दिवस असल्याने बहिणीने भावाकडे जाऊन त्याला राखी बांधण्या बरोबरच त्याच्या पाठीशी उभ राहण्याच भाग्य ही सविता यांना लाभलं. खरंतर यकृतदानाचा निर्णय मोठा आहे. मात्र, सविता यांच्या या निर्णयाला त्यांच्या मुला-बाळांनीच नाही, तर सासरच्या मंडळींनी पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे दर वर्षी साताऱ्यातील फलटणमध्ये साजरी होणारी भावा-बहिणींची राखीपौर्णिमा सोमवारी पुण्यात हॉस्पिटलमध्ये होणार असली, तरी या एका दिवसाने दोन्ही कुटुंबांची वीण अधिक मजबूत होणार असल्याचे समाधान सर्वच कुटुंबीयांना आहे.

पुण्यातला धक्कादायक प्रकार, पोलिसांनीच घडवून आणला शेतकऱ्यावर खुनी हल्ला

भावाला जीवनदान देण्यासाठी ही अनोखी भेटच सावित्राकडून शंकर यांना मिळणार आहे. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च उभारण्याची जबाबदारी सर्व भावंडांनी मिळून सांभाळली आहे. त्याशिवाय विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने काही आर्थिक मदत नलावडे कुटुंबाला मिळाली आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी अमृता फडणवीसांची उडी, ट्विटकरून मुंबईकरांवर म्हणाल्या

मालमत्ता किंवा आर्थिक हिस्सा देताना बहिणीला बेदखल करण्याच्या प्रकारातून भावाबहिणीच्या नात्यात आयुष्यभराचे वित्तुष्ट निर्माण होत असताना राखीपौर्णिमेलाच यकृत प्रत्यारोपणातून बहिणीने भावाच्या जीवनाचे रक्षण करणे, हा योगायोग निश्चितच नाही. आमची दोन्ही भावंडे या कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडतील, अशी आशा सविता यांचे दुसरे बंधू प्रदीप नलावडे यांनी व्यक्त केली आहे आपणही त्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करूयात.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 3, 2020, 2:29 PM IST

ताज्या बातम्या