रोहित पवारांचं अनोख रक्षाबंधन, कोरोना संकटात जगाला वाचवणाऱ्या बहिणीचा घेतला आशीर्वाद

रोहित पवारांचं अनोख रक्षाबंधन, कोरोना संकटात जगाला वाचवणाऱ्या बहिणीचा घेतला आशीर्वाद

राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आजचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचं एक सुंदर उदाहरण त्यांनी सगळ्यांसमोर ठेवलं आहे.

  • Share this:

पुणे, 03 ऑगस्ट : आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आजचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचं एक सुंदर उदाहरण त्यांनी सगळ्यांसमोर ठेवलं आहे. रोहित पवार यांनी आज ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरं केलं.

आज भाऊ-बहीणीच्या पवित्र नात्याचा दिवस आहे. अशात या सणावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे आज अनेकांना रक्षाबंधन साजरं करता येणार नाही. कोरोनाच्या जीवघेण्या महामारीमुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्था कामाला लागली आहे. डॉक्टर, नर्स, सफाई कामगार हे गेल्या कित्येक महिन्यांपासून काम करत आहे. त्यामुळे आपली रक्षा करणाऱ्या खऱ्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा करण्यासाठी रोहित पवार हे आज रुग्णालयांची भेट घेत आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी 24 तासांत 50 हजारहून अधिक नवे रुग्ण, ही आकडेवारी दिलासादायक

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ-बहिणीचं अतूट नातं रक्षाबंधनाच्या धाग्यांनी अधिक घट्ट करणारा हा सण आपल्या सर्वांच्या घरात आनंद, चैतन्य, उत्साह घेऊन घेईल. रक्षाबंधनाचा सण समाजातील समस्त माता-भगिनींबद्दलचा मान-सन्मान, आदर वाढवणारा असेल. भाऊ-बहिणीचं पवित्र नातं साजरं करीत असताना समाजातील स्त्री-पुरुष समानतेची भावना या सणामुळे अधिक दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन

Weather Alert: मुंबईत ऑरेंज तर या भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट

रक्षाबंधनाचा हा सण भावांनी बहिणीच्या रक्षणाचा संकल्प करण्याचा, बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेण्याचा असला तरी, आज कोरोना संकटकाळात आपल्या अनेक महिला डॉक्टर भगिनी, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, महिला पोलिस, इतर महिला कर्मचारी असा मोठा भगिनीवर्ग जीवाची जोखीम पत्करुन समाजातील इतर भावांचं कोरोनापासून रक्षण करण्यासाठी लढत आहे. या समस्त भगिनीशक्तीच्या शौर्य, त्याग, समर्पणाबद्दल आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी कृतज्ञ राहण्याची गरज आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील समस्त भगिनीशक्तीचा गौरव केला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 3, 2020, 10:20 AM IST

ताज्या बातम्या