मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणाची मोठी बातमी, मुख्य आरोपीला अखेर अटक

राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणाची मोठी बातमी, मुख्य आरोपीला अखेर अटक

 पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मौर्यला वाकडमध्ये पोलिसांनी अटक केली.

पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मौर्यला वाकडमध्ये पोलिसांनी अटक केली.

पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मौर्यला वाकडमध्ये पोलिसांनी अटक केली.

    पिंपरी चिंचवड, 15 जुलै : प्रसिद्ध मराठी कला दिग्दर्शक राजेश साप्ते (Raju Sapte Suicide) आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश मौर्यला अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मौर्यला वाकडमध्ये पोलिसांनी अटक केली. पिंपरी- चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) कला दिग्दर्शक राजू सापते (Raju Sapte) यांनी 3 जुलै रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली होती. पण, मुख्य आरोप असलेला राकेश मौर्य हा फरार होता. राकेश मौर्य हा वाकडमध्ये लपून बसला होता. पोलिसांना चकमा देऊन तो पळून जाणार होता. याची कुणकुण पोलिसांना लागली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाकडमधून राकेश मौर्याच्या मुसक्या आवळल्या. राकेश मौर्यला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आत्तापर्यंत  4  आरोपींना अटक झाली आहे. तर इतर 5 आरोपींचा शोध सुरू आहे. '...नाहीतर करीनाच्या घरासमोर आंदोलन करू', पुस्तकावरून बीडमध्ये पेटला वाद राजेश साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट आणि एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यातूनच काही व्यक्ती त्यांना त्रास देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच आरोपींनी कट रचून राजेश साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. JEE Main Exam 2021: चौथ्या सत्राची परीक्षा पुढे ढकलली; आता 'या' तारखेला परीक्षा तसंच, लेबरला कामावर येऊ देणार नाही. शिवाय व्यावसायिक नुकसान करण्याची ही धमकी देखील देण्यात आली होती. राजेश यांना दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. राजेश यांना अडीच लाख रुपये देण्यास भागही पाडलं होतं, असं मयत राजेश यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानंतर पोलिसांनी नरेश मिस्त्री नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. त्यानंतर आज महत्त्वाची कारवाई पार पडली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या