मराठी बातम्या /बातम्या /पुणे /"...आणि मी घरी जाऊन लेहंगा तपासला" राज ठाकरेंनी सांगितला पहिल्या भाषणाचा किस्सा

"...आणि मी घरी जाऊन लेहंगा तपासला" राज ठाकरेंनी सांगितला पहिल्या भाषणाचा किस्सा

पहिल्यांदा भाषण करताना नेमकं काय घडलं होतं? राज ठाकरेंनी पुण्यातील कार्यक्रमात सांगितला तो किस्सा.

पहिल्यांदा भाषण करताना नेमकं काय घडलं होतं? राज ठाकरेंनी पुण्यातील कार्यक्रमात सांगितला तो किस्सा.

पहिल्यांदा भाषण करताना नेमकं काय घडलं होतं? राज ठाकरेंनी पुण्यातील कार्यक्रमात सांगितला तो किस्सा.

पुणे, 4 सप्टेंबर : बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या 100 व्यां वाढदिवसानिमित्त मनसेच्या (MNS) वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या वक्तृत्व स्पर्धेत दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) विचाराचा आजच्या काळातला परिणाम या विषयांवर वक्त्यांना भाषणाची संधी देण्यात आली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) उपस्थित होते. यावेळी राज यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत आपल्या पहिल्या भाषणाचा किस्सा सांगितला.

जाहीर भाषण करणाऱ्यांना बघून आपल्याला शालेय जीवनात हेवा वाटत होता असं सांगत राज्यांनी सगळ्यांनाच भुवया उंचावायला भाग पडलं. शालेय जीवनात आपण कधीही वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही, उलट जाहीर भाषण करायला जाम भीती वाटत असल्याचं त्यांनी सगळ्यांसमोर कबूल केलं. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी अचानक दिलेल्या आदेशाने पहिल्यांदा भाषण केल्याची आठवण (Raj Thackeray shares first speech experience) त्यांनी सांगितली.

मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

पाकिस्तानचे क्रिकेट टीम भारतात सामने खेळायला येणार होती मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत हे सामने होऊ देणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली आणि त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतात मॅचेस खेळायला यायचा निर्णय रद्द केला. त्यावर राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना विजयी मेळावा घेण्याचे सुचवलं होतं. त्याचं सगळं नियोजन त्यांनी स्वतः पाहिलं ज्यात पाकिस्तानचा झेंडा असलेला एक राक्षस दारू ठासून तयार करण्यात आला होता. शिवाजी पार्कवरच्या या कार्यक्रमाला प्रचंड मोठी गर्दी जमली होती, कार्यक्रम सुरू झाल्यावर अचानक बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना "तू बोलणार ना?" असा प्रश्न विचारला.

बाळासाहेबांच्या प्रश्नानंतर राज ठाकरे गांगरून गेले आणि ते बाळासाहेब यांना म्हणाले, तू असं काही बोलू नको... मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाईन. त्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना थेट आदेश देत आता तू बोलतोस की मी उठून जाहीर करू असा सवाल केला आणि त्यानंतर राज ठाकरे यांना भाषण कराव लागल. त्यावेळी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या गर्दीसमोर बोललो आणि जेव्हा घरी गेलो तेव्हा घरी जाऊन स्वतःचा लहंगा तपासला इतकी भीती ते भाषण करताना वाटली होती असे राज ठाकरे यांनी सांगितल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आपण मोठमोठ्या वाक्यांमध्ये श्रीपाद अमृत डांगे जॉर्ज फर्नांडिस आणि अटल बिहारी वाजपेयी यांना अनेकदा ऐकल. त्यांचाही प्रभाव आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Pune, Raj thackarey