Home /News /pune /

'राज्यपाल कुडमुडे ज्योतिषी' राज ठाकरेंनी नक्कल करून सुनावले

'राज्यपाल कुडमुडे ज्योतिषी' राज ठाकरेंनी नक्कल करून सुनावले

पुण्यात मनसेचा वर्धापन दिन दणक्यात साजरा झाला. तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरे यांची चौफेर तोफ धडाडली.

पुणे, 08 मार्च : 'राज्यपालांना काही समज बिमज आहे, का? नको तिथे बोटं घालायला तुम्हाला कुणी सांगितलं, मी जेव्हा भेटलो तेव्हा ते कुडमुडे ज्योतिषी वाटले. ही लोक फक्त तुमची माथी भडकावण्यासाठी बोलतात' असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी राज्यपालांवर (governor bhagat singh koshyari) जोरदार घणाघात केला. पुण्यात मनसेचा वर्धापन दिन दणक्यात साजरा झाला. तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरे यांची चौफेर तोफ धडाडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी राज ठाकरेंनी घणाघाती टीका केली. 'ते परवा आमचे राज्यपाल बोलले,  काही समज बिमज आहे, का. मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा शेकहँड घेतला तेव्हा असं वाटलं की, हात बघून इथं मंगळ आहे, तिथे बुध आहे असं सांगितली असं वाटलं. कुडमुडे ज्योतिषी असतात ना तसे राज्यपाल आहे, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. 'रामदास स्वामींनी काय सांगितलं आहे ना ते मी घरात लावले आहे. शिवाजी महाराज यांच्याबद्दल इतकं चांगलं लिहिलं आहे, असं कधी वाचलं नाही. श्रीमंत योगी असं नाव दिलं आहे. आमच्याकडे ईडीची धाड पडली की तो श्रीमंत कळतो. एवढाच यांचा उद्योग सुरू आहे फक्त लोकांची माती भडकवली जात आहे' अशी टीकाही त्यांनी केली. 'राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विधान केलं. अहो त्यावेळी लहानपणी लग्न व्हायची, अजून तुमचे तरी लग्न झाले नाही. नको तिथे बोट कशाला घालायचं. त्यानंतर लगेच तुम्हाला काय वाटतं, असं म्हणत माध्यम सुरू झाली. पण जेव्हा निवडणुका लांबणीवर पडल्या तेव्हा सगळे शांत झाली, असंही राज ठाकरे म्हणाले. 'मी काही जास्त बोलणार नाही. आज फक्त टिझर आहे. 2 एप्रिलला शिवतीर्थावर पिक्चर पाहण्यास मिळणार आहे. सत्ताधारी म्हणाले आम्हाला संपवायला निघाले, विरोधक म्हणाले सत्ताधारी आम्हाला संपवायला निघाले. मग उरलं कोण, उरलो आपण. मी अशी गोष्ट कधी पाहिली नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. 'कुणी महिलांबद्दल बोलत नाही, विद्यार्थी घरी आहे, त्याबद्दल कुणी बोलत नाही. त्यांच्या भविष्याबद्दल बोलत नाही. एसटी बस सुरू होणार आहे की नाही, याबद्दल या लोकांना काहीही पडले नाही' अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. 'जी लोकं आपल्याला मतदान करतात ना त्यांचे आभार माना. संपर्क कार्यालय उघडून बसले आहात. कोण विचारतं तुला असं काय आहे तुझ्याकडे. एकटाच बसलेला असतो. कार्यालय हे आहे की लोकं तुमच्याकडे काम घेऊन येतात, ते तुमचे कार्यालय आहे.  महाराष्ट्रातून लोकं आपल्याकडे येतात, सरकारकडे जात नाही. त्यामुळे तो आपला पक्ष आहे.  लोकं ज्या विश्वासाने आपल्याकडे येतात ना 16 वर्षांतली ही कमाई आहे. तुम्ही कोरोनाच्या काळात जे काम केले, त्यासाठी आभार हा एवढाच हा शब्द आहे' असंही राज ठाकरे म्हणाले. मध्यतंरी अनेक कार्यकर्ता यांच्या घरी जेवायला गेलो. यापुढेही येणार पण जात बघून नाही. येत्या 21 मार्च रोजी छत्रपतींची तिथीनुसार जयंती ऊत्साहात साजरी करा. तारखेनं करा की तिथी ने करा, मी तर म्हणतो,  रोज करावी. आम्ही तिथीने का करतो तर आपले सण आपण तिथीनुसार साजरे करतो म्हणूनच आपल्या राजाची जयंती ही सणाप्रमाणे साजरी करा, असंही राज ठाकरे म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या