Home /News /pune /

'अहो, तुमचं तर अजूनही लग्न नाही झालं', राज ठाकरेंनी ठेवलं राज्यपालांच्या जखमेवर बोट!

'अहो, तुमचं तर अजूनही लग्न नाही झालं', राज ठाकरेंनी ठेवलं राज्यपालांच्या जखमेवर बोट!

''राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विधान केलं. अहो त्यावेळी लहानपणी लग्न व्हायची'

पुणे, 08 मार्च : 'राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिबा, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विधान केलं. अहो त्यावेळी लहानपणी लग्न व्हायची, अजून तुमचे तरी लग्न झाले नाही. नको तिथे बोट कशाला घालायचं' असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari)  यांच्या घराचा प्रपंचच जनतेसमोर मांडला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल भाष्य केलं होतं. त्यांच्या विधानाचा निषेध करत राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. 'राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विधान केलं. अहो त्यावेळी लहानपणी लग्न व्हायची, अजून तुमचे तरी लग्न झाले नाही. नको तिथे बोट कशाला घालायचं. त्यानंतर लगेच तुम्हाला काय वाटतं, असं म्हणत माध्यम सुरू झाली. पण जेव्हा निवडणुका लांबणीवर पडल्या तेव्हा सगळे शांत झाली, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. 'राज्यपालांना काही समज बिमज आहे, का? नको तिथे बोटं घालायला तुम्हाला कुणी सांगितलं, मी जेव्हा भेटलो तेव्हा ते कुडमुडे ज्योतिषी वाटले. ही लोक फक्त तुमची माथी भडकावण्यासाठी बोलतात. मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा शेकहँड घेतला तेव्हा असं वाटलं की, हात बघून इथं मंगळ आहे, तिथे बुध आहे असं सांगितली असं वाटलं. कुडमुडे ज्योतिषी असतात ना तसे राज्यपाल आहे, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. 'रामदास स्वामींनी काय सांगितलं आहे ना ते मी घरात लावले आहे. शिवाजी महाराज यांच्याबद्दल इतकं चांगलं लिहिलं आहे, असं कधी वाचलं नाही. श्रीमंत योगी असं नाव दिलं आहे. आमच्याकडे ईडीची धाड पडली की तो श्रीमंत कळतो. एवढाच यांचा उद्योग सुरू आहे फक्त लोकांची माती भडकवली जात आहे' अशी टीकाही त्यांनी केली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या