राज ठाकरेंनी दिली चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची ऑफर, भाजपच्या आमदाराचा गौप्यस्फोट

राज ठाकरेंनी दिली चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची ऑफर, भाजपच्या आमदाराचा गौप्यस्फोट

'राज यांची ऑफर नाकारलीय. आपण पक्षा सोबतच राहणार असून चंद्रकांत पाटील यांना मोठया मताधिक्याने निवडून आणू '

  • Share this:

अद्वैत मेहता 01 ऑक्टोंबर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाजपने पुण्यातल्या कोथरूडमधून उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये धुसफूस सुरु झालीय. कोथरुडच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी या नाराज असल्याचीही चर्चा होती. नंतर कुलकर्णी यांनी नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र त्यांच्या चेहेऱ्यावरची नाराजी त्या लपवून ठेवू शकल्या नाहीत. आज त्यांनी एक मोठा गोप्यस्फोट केलाय. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला फोन करून चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची ऑफर दिली होती असं त्यांनी सांगितलं. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांनी आपल्याला फोन केला होता. कोथरूड मधून लढण्याची त्यांनी ऑफर दिली होती. आपण ऑफर नाकारलीय. आपण पक्षा सोबतच राहणार असून चंद्रकांत पाटील यांना मोठया मताधिक्याने निवडून आणू असंही त्यांनी सांगितलं. आपण पक्षा विरोधात जाणार नाही असंही त्या म्हणाल्या.

हे साताऱ्यातच होऊ शकतं, कंदी पेढ्यांनी राजेंना आंघोळ! पाहा हा VIDEO

कोथरूड चे माजी शिवेसेना आमदार चंद्रकांत मोकाटे अपक्ष म्हणून शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने ही जागा मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलीय. पाटील यांच्या विरुद्ध विरोधीपक्ष एकच उमेदवार देण्याचीही शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का, काँग्रेसचाच 'हा' नेता देणार त्यांना टक्कर

सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी कोथरूडमधून लढावं अशी ऑफर स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी यांनी चौधरी यांना दिली आहे. या आधी शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील लढतील त्या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता सगळे राजकीय पक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता कोथरुडकडे लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 09:12 PM IST

ताज्या बातम्या