मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणे तिथे काय उणे, अखेर राज ठाकरेंनी मास्क वापरला, कारण...

पुणे तिथे काय उणे, अखेर राज ठाकरेंनी मास्क वापरला, कारण...

'बाबासाहेब पुरंदरे यांनी पहिलं पुस्तक हे 50 वर्षांपूर्वी लिहिलं होतं, मग त्यावेळी चुकीचं जाणवलं नाही का?'

'बाबासाहेब पुरंदरे यांनी पहिलं पुस्तक हे 50 वर्षांपूर्वी लिहिलं होतं, मग त्यावेळी चुकीचं जाणवलं नाही का?'

या भेटीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील एका लिखानाबाबत दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाली.

पुणे, 20 जुलै : राज्यात कोरोनाचा (corona) संसर्ग वाढू नये म्हणून मास्क (mask) वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र,  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) हे त्याला अपवाद ठरले आहे. राज ठाकरे यांनी आपण मास्क वापरणार नाही, जाहीरपणे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अनेक कार्यक्रमात राज ठाकरे हे विनामास्क पाहण्यास मिळाले. पण, आज पुण्यात राज ठाकरे चक्क मास्क लावून पोहोचले होते.

राज ठाकरे पुणे जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहे. आज सकाळीच त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र्र भूषण बाबासाहेब पुरंदरे (raj thackeray meet babasaheb purandare) यांची भेट घेतली.  या भेटीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील एका लिखानाबाबत दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाली. विशेष म्हणजे, यावेळी राज ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. बाबासाहेब यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे मास्क लावून पोहोचले होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांच्यातला जिव्हाळा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राज ठाकरे ज्या ज्या वेळी पुणे दौऱ्यावर असतात त्यावेळी ते हमखास पुरंदरे यांची भेट घेत असतात. 2019 मध्ये अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी खुद्द राज ठाकरे हे पुणे येथील निवासस्थानी आले होते. त्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंनी देखील लग्नाला उपस्थिती लावत अमित आणि मितालीला आशीर्वाद दिले होते.

या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. राज यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते होते. त्यामुळे कोरोनाची परिस्थितीत पाहता खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावूनच बाबासाहेबांच्या घरी एंट्री केली.

आता सिम कार्डप्रमाणे रिचार्ज करावे लागणार घरचे विजेचं बिल, आले नवे स्मार्ट मीटर!

दरम्यान, पुणे दौऱ्यावर आल्यानंतर राज ठाकरे यापुढे शाखा अध्यक्षाच्या (MNS branch president) घरी जेवायला जाणं पसंत करणार आहेत,अशी घोषणाच खुद्द राज ठाकरेंनी केली आहे. आगामी वर्षातील पुणे मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.

IND vs ENG : सराव सामन्यात टीम इंडियाची बॅटिंग फ्लॉप, पुजाराने 'हसं' करून घेतलं

पहिल्याच दिवशी त्यांनी मनसे नेते, शहराध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, संघटक, शाखाध्यक्ष अशा तब्बल 40 पक्ष पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधला आणि त्यांना थेट लोकांमध्ये जाऊन काम करण्याचे आदेश दिले. तसंच पुणे शहर बैठकीत प्रभाग अध्यक्ष हे पद रद्द करून वार्डनिहाय शाखाध्यक्ष नेमण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर मनसेला तब्बल 181 शाखाध्यक्ष मिळतील, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना दिली.

First published: