मराठी बातम्या /बातम्या /पुणे /राज ठाकरेंनी घेतली पुण्यातील शिलेदारांची बैठक, पदाधिकाऱ्यांनी दिला 'एकला चलो रे'चा नारा

राज ठाकरेंनी घेतली पुण्यातील शिलेदारांची बैठक, पदाधिकाऱ्यांनी दिला 'एकला चलो रे'चा नारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील राजमहल या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील राजमहल या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील राजमहल या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली

पुणे, 05 फेब्रुवारी : मुंबईपाठोपाठ पुणे महापालिकेची (pune municipal corporation election) सुद्धा वर्षभरावर निवडणूक येऊन ठेपली आहे. पण आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी सुद्धा पुण्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सर्वच शिलेदारांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील राजमहल या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पुणे पालिका निवडणूक  1 वर्षावर येऊन ठेपल्याने राज यांनी पालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्राचा दौरा करण्यापूर्वी राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळे आनंदी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यालाही सोबत येऊ द्यावं, अशी गळ घातली आहे.

तसंच पक्षाने हिंदुत्ववादी भूमिका वळण घेतलं असलं तरी निवडणुकीत 'एकला चलो रे' अशीच भूमिका असावी, अशी बहुसंख्य मनसैनिकांची भावना असल्याचं पदाधिकाऱ्यांनी राज यांच्या कानावर घातलं, अशी सूत्रांनी माहिती दिली.

सध्या मनसेचे केवळ 2 नगरसेवक पुणे पालिकेत आहेत. 2012 साली 29 नगरसेवक होते. तेव्हा पक्ष 2 ऱ्या क्रमांकावर होता. राज ठाकरे एकट्याने लढणार का? भाजपासोबत युती करणार हे गुलदस्त्यात आहे.  सध्या तरी कामाला लागा एवढाच संदेश त्यांनी दिला आहे.  मनसेचा वर्धापन दिन पुढच्या महिन्यात आहे. त्याच दिवशी राज ठाकरे पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकतील अशी अटकळ आहे.

डोंबिवलीमध्ये मनसेला दोन हादरे आणि राज ठाकरेंचं डॅमेज कंट्रोल

दोन दिवसांपूर्वीच कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेमध्ये मोठी पडझड झाल्याचे पाहण्यास मिळाली. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी रात्री पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ माजी विरोधीपक्षनेते, गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे खुद्द राज ठाकरे यांनी दखल घेऊन रिक्त झालेल्या डोंबिवली शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक मनोज घरत यांची निवड केली.  अचानक पडलेल्या खिंडारामुळे थेट याची झळ कृष्णकुंजपर्यंत पोहोचली. त्यामुळे अवघ्या 24 तासात जुन्या शिलेदाराला नवी जबाबदारी देऊन राज ठाकरे यांनी पडझड थांबवली होती.

First published: