राज ठाकरे पुण्यात उलगडणार शरद पवारांचे 'राज'कारण पर्व!

जागतिक मराठी सम्मेलनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज २१ फेब्रुवारीला अभूतपूर्व मुलाखत घेणार आहेत.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2018 11:10 AM IST

राज ठाकरे पुण्यात उलगडणार शरद पवारांचे 'राज'कारण पर्व!

21 फेब्रुवारी : जागतिक मराठी सम्मेलनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज २१ फेब्रुवारीला अभूतपूर्व मुलाखत घेणार आहेत. या बहुप्रतीक्षीत मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. या आधीच कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे ३ जानेवारीला नियोजित मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. पण अखेर तो दिवस आज आला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे शरद पवारांची प्रकट मुलाखत घेणार आहे.

पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. पवारांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रसिद्ध हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या प्रकट मुलाखतीचं आयोजन केलं आहे. राजकारणातल्या दोन पिढ्यांचा सहभाग असलेल्या या मुलाखतीची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे.

शरद पवार म्हणजे राजकारणातील अत्यंत मातब्बर असं व्यक्तिमत्त्व. पन्नास वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकही निवडणूक न हारण्याचे साहेबांचे रेकॉर्ड आहेत. राजकारणात मुरलेल्या साहेबांना बोलतं करण्याचं आव्हान भल्याभल्यांना घाम फोडते, मात्र त्यांच्याशी संवाद साधणारी व्यक्ती जर राजकारणातील असेल आणि त्यांनी लहानपणापासून साहेबांची कारकीर्द जवळून अनुभवली असेल, तर मग त्या मुलाखतीला वेगळा रंग चढल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, या मुलाखती संदर्भात आमदार सुप्रीया सुळे यांना विचारलं असता, 'ठाकरे कुटुंबाशी आमचं जिव्हाळ्याचं नाते आहे. आम्ही विरोधात काम करत असलो तरी आमच्यात अंतर्गत मदभेद नाही आहेत. त्यामुळे या मुलाखतीसाठी मी खूप उत्सुक आहे.' असंही त्या म्हणाल्या. त्यामुळे या मुलाखतीकडे राजकारण्यांचंही तितकंच लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2018 07:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...