Home /News /pune /

Weather Forecast Today: राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा जोर वाढला; आज पुण्यासह 18 जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Weather Forecast Today: राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा जोर वाढला; आज पुण्यासह 18 जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Weather Forecast Today: काही दिवसांत महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमानात विक्रमी वाढ झाल्यानंतर, राज्यात आता पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची (Non seasonal rainfall) शक्यता आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 08 मार्च: गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमानात (Temperature in Maharashtra) विक्रमी वाढ झाल्यानंतर, राज्यात आता पावसासाठी पोषक हवामान (Rainy weather) तयार झालं आहे. पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. आज पुण्यासह 18 जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो आणि ऑरेंज अलर्ट (Yellow and orange alert) जारी केला आहे. काल सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. पपई, केळी, गहू, हरभरा अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळपास 11 गावातील अकराशेहून अधिक शेतकऱ्यांचं सातशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील आणखी तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज हवामान खात्यानं नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीटही होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय आज पुण्यासह पालघर, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. हेही वाचा-सावधान! धोका अजूनही टळला नाही; चीनमध्ये कोरोनानं वर काढलं डोकं; Wuhan हॉटस्पॉट उद्या देखील कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. उद्या कोकणासह मध्य आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि लगतच्या विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. खरंतर सध्या वाऱ्यांच्या संगमामुळे आणि पूर्वेकडील वेगवान वाऱ्यामुळे केरळ किनारपट्टी ते कोकण किनार्‍यापर्यंत पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Rain updates, Weather forecast, Weather update, Weather warnings

    पुढील बातम्या