• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • Weather Alert: कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर वाढला; पुढील 5 दिवस पुण्याला हवामान खात्याचा इशारा

Weather Alert: कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर वाढला; पुढील 5 दिवस पुण्याला हवामान खात्याचा इशारा

हवामान खात्यानं आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्यानं आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.

Weather Forecast in Maharashtra: हवामान खात्यानं आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.

 • Share this:
  पुणे, 11 सप्टेंबर: गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसानं (heavy rainfall in Maharashtra) पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दुसरीकडे मात्र काही भागात झालेला पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखावणारा ठरला. राज्यात सध्या अनेक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे. आज सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे परिसरात हलक्या पाऊस कोसळत आहे. सायंकाळनंतर याठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहेत. तसेच आजपासून पुढील पाच दिवस कोकण, घाट परिसर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं आज पुणे रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना IMD कडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हेही वाचा-आता काखेतून कोरोनाचं निदान; घाम सांगणार तुम्हाला संसर्ग आहे की नाही संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हेही वाचा-कोरोनातून बरं झालेल्यांच्या किडनीवर होतायेत गंभीर परिणाम? संशोधनातून माहिती समोर पुण्यात 5 दिवस पावसाचे गेल्या आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. पुढील पाचही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून पुढील पाच दिवस पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: