• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • Weather Update: आज 4 जिल्ह्यात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस; मात्र पुण्यात असणार अशी स्थिती

Weather Update: आज 4 जिल्ह्यात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस; मात्र पुण्यात असणार अशी स्थिती

Weather Forecast in Maharashtra: हवामान खात्याने आज दक्षिण कोकण आणि घाट परिसरात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज एकूण चार जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.

 • Share this:
  पुणे, 24 नोव्हेबर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची (Rain in maharashtra) नोंद झाली आहे. अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low pressure area) राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला आहे. आजही दक्षिण कोकण आणि घाट परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं आज एकूण चार जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये, तसेच मोठा झाडाच्या आडोशाला उभं न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. हेही वाचा-भारतात बूस्टर शॉट्स सुरू व्हायला हवेत का? जगात काय स्थिती? तज्ञांचं म्हणणं काय? दुसरीकडे, आज पुण्यासह सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी अंशत: ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर पूर्णपणे कमी होणार आहे. पुढील चार दिवस राज्यात कोणताही इशारा देण्यात आला नाही. राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान राहिल्याने पिकांवर रोग पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. हेही वाचा-कोरोनामुळे होऊ शकतात आणखी 7 लाख मृत्यू, WHO चा ‘हिवाळी’ इशारा पुण्यात काय असेल हवामान? गेल्या आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. आजही सकाळपासून पुण्यात अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुढील तीन-चार तासातआजही पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार दिवस पुण्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे.
  Published by:News18 Desk
  First published: