मुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी

पुण्याला रात्रभर पावसानं झोडपलं. अनेक सोसाट्यांमध्ये शिरलं पाणी, पाण्यात वाहनंही गेली वाहून.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 10:40 AM IST

मुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी

अद्वैत मेहता (प्रतिनिधी)

पुणे, 22 ऑक्टोबर: परतीचा पाऊस जाणार म्हणता म्हणता पुन्हा एकदा मुसळधार पावसानं पुण्यात थैमान घातलं आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे काही भागांत गुडघाभर तर काही ठिकाणी कंबरेपर्यंत पुन्हा एकदा पाणी साठल्याचं पाहायला मिळालं. येरवडा, शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी-आझादनगर, बी.टी.कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड इथं घरामध्ये पाणी भरलं होतं. तर कात्रज, नवीन वसाहत इथे रात्रीच्या पावसानं पाण्याचा जोरदार प्रवाह वाहात होता.

दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर मुसळधार पावसानं रात्री पुन्हा एकदा पुण्याला झोडपलं. आजूबाजूच्या डोंगरावरून पाणी वाहत आल्याने सखल भागात पाणी शिरलं. लोहगाव भागात सोसायट्यांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले. पार्किंगमध्ये पाणी शिरल्यानं अनेक वाहनं पाण्यात बुडाली. जकात नाक्याजवळ पाण्यात अडकलेल्या खासगी कंपनीच्या साधारण 20 ते 23 प्रवाशांना दोरीच्या सहाय्यानं अग्निशमन दलाने सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

महाअर्बन मारवाड बँकेतही पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. योजनानगर परिसरात अनेक घरांमध्ये पाणी आल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नागरिकांसमोर पुन्हा एकदा हतबल होऊन पाहात बसण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही. तर अनधिकृत बांधकामंही या सगळ्याला जबाबदार आहेत का? याची चौकशी होणं गरजेचं आहे. याआधीही पुण्यात पावसामुळे पाणी साठल्यामुळे भीषण स्थिती निर्माण झाली होती.

सोमवारी जास्त पाऊस झाल्यामुळे अशी स्थिती ओढवली आहे. दरम्यान संपूर्ण परिस्थीतीची पाहणी पालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे.

Loading...

VIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 10:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...