मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Weather Forecast: दक्षिण कोकणसह घाट परिसरात जोरदार पावसाचा इशारा; काय असेल पुण्यातील स्थिती?

Weather Forecast: दक्षिण कोकणसह घाट परिसरात जोरदार पावसाचा इशारा; काय असेल पुण्यातील स्थिती?

दक्षिण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील एकूण सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील एकूण सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Rain In Maharashtra: सध्या बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे पूर्व विदर्भासह महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे.

    पुणे, 26 ऑगस्ट: मागील चार-पाच दिवसांपासून राज्यात पावसानं (Rain in Maharashtra) पूर्णपणे उघडीप घेतली आहे. दरम्यानच्या कालावधीत पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे पूर्व विदर्भासह महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दक्षिण कोकणातील काही भागासह घाट परिसर, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज हवामान खात्यानं दक्षिण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील एकूण सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट (Yellow alerts) जारी केली केला. हेही वाचा-बारकाईनं लक्ष ठेवा! राज्यातल्या 'या' 24 जिल्ह्यांमध्ये डेल्टा + व्हेरिएंटचा धोका संबंधित सहा जिल्ह्यांत आज अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान ताशी 30 ते 40 प्रतितास वेगानं वारे वाहणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. तसेच आकाशात मोठ्या प्रमाणात विजा चमकणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मोठा झाडाखाली अडोशाला उभं न राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. हेही वाचा-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी महत्त्वाची, देशात तिसऱ्या लाटेचे संकेत पुण्यातही विजांचा कडकडाट मागील काही दिवसांपासून पुण्यात पावसानं उघडीप घेतली आहे. गेल्या आठभर पुण्यात अंशत: ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण राज्यातून पाऊस गायब झाल्यापासून पुणे जिल्ह्यात तापमानाचा पारा काहीसा वाढला असून नागरिकांना उकाड्याचा त्रास होतं आहे. आजही पुण्यात पावसाची शक्यता नाही, मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांचा गडगडाट होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुण्यासह लातूर, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत पावसाची शक्यता नसली तरी विजांचा कडकडाट होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Pune, Weather forecast

    पुढील बातम्या