मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune rain : पुण्यात तुफान पाऊस, पालिकेनं जारी केला हेल्पलाईन नंबर!

Pune rain : पुण्यात तुफान पाऊस, पालिकेनं जारी केला हेल्पलाईन नंबर!

तर पुणे रेल्वे स्थानक परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

तर पुणे रेल्वे स्थानक परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

तर पुणे रेल्वे स्थानक परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

 

पुणे, 04 ऑक्टोबर : मराठवाड्यात पावसाने (marathwada rain) धुमशान घातल्यानंतर आता मोर्चा पुण्याकडे वळवला आहे.  पुण्यात संध्याकाळपासून विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस (heavy rain in pune)  सुरू आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून हेल्पलाईन नंबरही दिला आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. तर दुसरीकडे पुण्यात अचानक वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये पाणी साचले आहे.  विजांच्या कडकडाटासह पावसाने धुमशान घातले आहे.

IPL 2021 : एमएस धोनीने जिगरी दोस्तालाच केलं बाहेर, CSK चा कठोर निर्णय'

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार,  पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा' असं आवाहन करण्यात आलं आहे.

तर पुणे रेल्वे स्थानक परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांचे अतोनात हाल झाले आहे. पालिका प्रशासनाने सुद्धा घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.

मदतीसाठी संपर्क साधा

आपत्ती व्यवस्थापन मदत व सेवा केंद्र

०२०-२५५०६८००/१/२/३/४

०२०-२५५०१२६९

तर पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या पुणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत.

सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा, असं आवाहन महापौर मोहोळ यांनी केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Pune rain