• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • येत्या 5 दिवसात कोकण-मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस; पुण्यासह मुंबईतही हाय अलर्ट

येत्या 5 दिवसात कोकण-मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस; पुण्यासह मुंबईतही हाय अलर्ट

दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात (Rain alert in maharashtra) आला आहे. पुढील पाचही दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे.

 • Share this:
  पुणे, 14 नोव्हेंबर: अरबी समुद्र (Arabian Sea) आणि बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (Low Pressure Area) ओसरल्यानंतर, दक्षिण अंदमान समुद्र (South Andman Sea) आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर (Thailand Coast) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील काही दिवसांत याचं चक्रिवादळात (Cyclone) रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात (Rain alert in maharashtra) आला आहे. पुढील पाचही दिवस अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज पुण्यासह एकूण 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील 3-4 तासांत संबंधित जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हीच स्थिती कायम राहणार आहे. हेही वाचा-Explainer : कोविड, डेंग्यू, झिकाच्या निदानासाठी कोणत्या चाचण्या आवश्यक? दुसरीकडे, दक्षिण अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता 15 नोव्हेंबरनंतर वाढणार आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची व्याप्ती आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून उत्तरेकडील थंड हवेचा जोर कमी झाला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ नोंदली आहे. हेही वाचा-एकच नंबर! Corona Vaccination मध्ये मुंबई पालिकेनं गाठला विक्रम पुण्यात पाच दिवस पावसाचे... पुण्यासह घाट परिसर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. काल पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आजपासून पुढील पाच दिवस पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाचही दिवस पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळणार आहेत. मंगळवारनंतर मुंबईतही अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
  Published by:News18 Desk
  First published: