Home /News /pune /

VIDEO: तुफान गारपीट, पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते झाले शुभ्र! पुढच्या काही तासांत राज्यांत अनेक भागांत कोसळणार सरी

VIDEO: तुफान गारपीट, पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते झाले शुभ्र! पुढच्या काही तासांत राज्यांत अनेक भागांत कोसळणार सरी

Weather Alert: पुण्यासह राज्याच्या अनेक भागात पुढच्या काही तासांत अवकाळी पाऊस गरजणार आणि बसरणार आहे. IMD ने काय इशारा दिला आहे वाचा...

मुंबई, 27 एप्रिल : उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच राज्यावर अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील तालुक्यांना गारपिटीनं झोडपले. अर्धा तास याठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस (Hail strom in Pimpri-chinchwad ) झाला आहे. तर राज्यांत काही भागांमध्ये वादळी वारं सुरू झालं असून काही ठिकाणी तुरळक पावसातच्या सरीदेखिल (Rain in Maharashtra) कोसळत आहेत. आगामी काही तासांत राज्यांत वीजांसह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (वाचा-सामान्य मुंबईकर होऊ शकता 'पोलीस', मुंबई पोलिसांचा नवा उपक्रम) राज्यात अनेक ठिकाणी वातावरण बदलल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे परिसरात तर काही भागांत पावसाला सुरूवात झाली आहे. तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याचं ही पाहायलला मिळालं. आगामी काही तासांत राज्याच जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्यांन पुणे, नाशिक, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड या भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापैकी काही भागांत वादळ, गारपिटीसह पूर्वमोसमीच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं आधीच 29 एप्रिलपर्यंत राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला होता. संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाच्या झळा वाढल्या होत्या. अचानक वातावरणात बदल होऊन अनेक भागांत बेमोसमी पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत. मध्य भारतासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (वाचा-सरन्यायाधीश एन व्ही रमणांच्या नावाचं बनावट Twitter Account बंद; ट्विटरची कारवाई) दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर, ठाणे अशा काही भागांमध्ये पावसाच्या सरी तर काही ठिकाणी गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज पुणे जिल्यात पावसानं हजेरी लावली आहे. तर रात्री मराठवाड्यातही अनेक भागांत वादळी वारे सुटलेलं पाहायला मिळालं. मंडळवारीही दुपारपासून वातावरण बदललं असून अनेक ठिकाणी ढग दाटून आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं पुढच्या काही तासांत महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळणार आहेत. या पावसामुळं गर्मीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी या काळात काळजी घ्यायला हवी. त्यांच्या शेतमालाचं या पावसात नुकसान होण्याची शक्यता असते.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Pune rain, Rain, Weather update, Weather warnings

पुढील बातम्या