पुणे, 01 ऑगस्ट : पुण्यातला राष्ट्रवादीचा वादग्रस्त नगरसेवक दीपक मानकर अखेर पोलिसांना शरण आलाय. जीतू जगताप आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्याचा जामीन नाकारला होता. त्यानंतर तो आज पुणे पोलिसांना शरण आलाय. मानकरला आज दुपारी 2च्या सुमारास शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जीतू जगताप हा दीपक मानकरचा खासगी सचिव होता. जमीन खरेदीच्या वादातून या दोघांमध्ये भांडणं झाली होती. या दबावातून जीतू जगतापने आत्महत्या केली होती.
VIDEO : मराठा आरक्षणासाठी तरुण महावितरण टॉवरच्या टोकावर बसले
दीपक मानकरच्या दबावापोटीच जीतूने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या भावाने केला. याप्रकरणी दीपक मानकरला मुख्य आरोपी करण्यात आलंय. पुण्यात दीपक मानकरची ओळख ही लॅन्डमाफिया अशी असून वाडा हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला मध्यंतरी अटकही झाली होती.
सुप्रीम कोर्टाने दीपक मानकर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावतानाच त्यांना १० दिवसांत पोलिसांसमोर शरण जाण्याचे आदेशही दिले होते. २ जून रोजी जितेंद्र जगताप यांनी घोरपडी येथे रेल्वेखाली आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जगताप यांनी मानकर यांच्यासह बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी आणि अन्य काहींची नावं लिहलेली होती. आपल्या आत्महत्येसाठी हे सर्व जबाबदार असल्याचे जगताप यांनी म्हटलं होतं. या आधारे पोलिसांनी मानकर आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटकही केली होती.
VIDEO : मुंबई लोकलच्या या 4 स्टंटबाजांमुळे कोट्यवधी लोकांच्या जीवाला आहे धोका
दीपक मानकर हे पुण्यात कायम वादग्रस्त राहिले आहेत. सत्ताधारी पक्षाला हाताशी धरून साम-दाम-दंड नीतीचा वापर ही त्यांची खासियत आहे. आत्तापर्यंत त्यांच्या दांडगाईची अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आली होती. पण प्रत्येक प्रकरणातून ते सहिसलामत सुटले. जवळपास सगळ्याच पक्षांचा वापर त्यांनी या दांडगाईसाठी केला आहे. तर मानकरांची दहशत असल्याने राजकीय पक्षांनी तात्कालीक फायद्यासाठी मानकरांचा वापर करून घेतला. या त्यांच्या जवळीकीमुळे त्यांच्यावर फार मोठी कारवाई कधीच झाली नव्हती पण आता मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा...
कशी आहे सोनाली बेंद्रेची तब्येत?, सांगतेय तिची नणंद
दिलेल्या शब्दाला जागले राज ठाकरे, गिरगावकरांच्या मदतीला धावले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dipak mankar, Jitendra jagtap, Suicide case, Supreme court, आत्महत्या प्रकरण, जितेंद्र जगतापदिपक मानकर, सुप्रीम कोर्ट